सरत्या वर्षांला निरोप देताना आणि नव्या वर्षांबरोबर नवे कपडे, नवीन वस्तू, नवीन वाहन, नवीन फर्निचर असा सगळा नवलाईचा आनंद लुटण्यासाठी आपण सज्ज असतो. नव्या वर्षांचे नव्या रूपात स्वागत करायचे तर वर्षांच्या शेवटच्या आठवडय़ातली ‘खरेदी’ ही फार महत्त्वाची ठरते. या खरेदीचे औचित्य ‘लोकसत्ता’ने आपल्या वाचकांना उपलब्ध करून दिले आहे. खरेदीचा आनंद आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या ‘सरप्राईज’ भरघोस बक्षिसांची लयलूट अशी सुवर्णसंधी ‘लोकसत्ता’ने १९ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान आयोजित केलेल्या ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या निमित्ताने वाचकांना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून रसिकांचे लाडके कलाकार या ‘शॉपिंग फेस्टिव्हल’निमित्त दुकानांना भेटी देत आहेत. शुक्रवारी या फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी आणि पहिल्यावहिल्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मुलाखतकार संपदा जोगळेकर-कुलकर्णी हिने परळ विभागातील काही दुकानांना भेट दिली.

परळ विभाग म्हणजे मराठमोळ्या कुटुंबांचे शॉपिंगसाठी हक्काचे ठिकाण. एकाच ठिकाणी होलसेल ते रिटेलपर्यंत सर्व दुकाने इथे पाहायला मिळतात. त्यामुळे खरेदीसाठी इथे कायम रेलचेल असते. संपदाने पहिली भेट दिली ती ‘रेन्बो टेक्स्टोरिअम’च्या मेन्सवेअर दुकानाला. परळ विभागात ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या दुकानामध्ये पुरुषांच्या कपडय़ांचे भरपूर प्रकार पाहायला मिळतात. त्यानंतरचा मुक्काम होता rv11rv12तो नायगावचे ‘अपना बाजार’चे स्टोअर. ‘अपना बाजार’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. टी. काजळे, उपकार्याध्यक्ष श्रीपाद फाटक, संचालक शिवाजी गावंड आणि नरेंद्र तुर्भे, संचालिका भारती शिरसाट आणि अंजली सावंत यांनी संपदाचे स्वागत केले. इथे मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलचे पहिलेवहिले विजेते संपदाची आतुरतेने वाट पाहत होते. १९, २०, २१, २२ आणि २३ डिसेंबरच्या वैभव महाडिक, यशपाल मुंबरकर, सुनीता बोरकर, शिवकुमार चव्हाण, सत्यविजय पावटे, चारुल पडवळ, मनोज कोतवाल, प्रशांत घाडी, स्वप्ना कुलकर्णी, नीता यादव, पूर्णिमा शानबाग, दर्शन वानखडे, सुश्मिता कमलाकर, शीतल देशपांडे, अर्चना कोयडे, महेश दाभिलकर, अरुण सोनार या विजेत्यांना संपदाच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
‘रिजन्सी ग्रुप’ हे या मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक आहेत. त्याशिवाय ‘जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड’ हे या फेस्टिव्हलचे सहप्रायोजक आहेत. ‘रेमंड शॉप’ हे ‘स्टायलिंग पार्टनर’, अंजली मुखर्जी यांचे हेल्थ टोटल हे ‘हेल्थ पार्टनर’, लागू बंधू आणि वामन हरी पेठे ‘प्लॅटिनम पार्टनर’ असतील. अपना बाजार, पितांबरी आणि दादर येथील पानेरी यांच्या सहकार्याने हा महोत्सव होत आहे. वीणा वर्ल्ड हे ‘ट्रॅव्हल पार्टनर’ आहेत. स्लीम अँड स्लेंडर ‘वेल बिइंग पार्टनर’ म्हणून आहेत. त्याशिवाय टोटल स्पोर्ट्स, केम्ब्रिज रेडीमेड्स – कुलाबा, राणेज् पर्सेस, रेन्बो गारमेंट्स, रोनाल्ड फूड प्रोसेसर, विधि ज्वेलर्स, अतुल इलेक्ट्रोनिक्स, सारी पॅलेस, परफेक्ट ऑप्टिक्स हे ‘गिफ्ट पार्टनर्स’ आहेत. या सर्वासोबतच ‘महिंद्रा गस्टो’ची टेस्ट राइड करणाऱ्यांनाही बक्षिसे मिळवण्याची सुवर्णसंधी घेता येईल. ‘महिंद्रा गस्टो’ हे या फेस्टिव्हलचे ‘टेस्ट राइड पार्टनर’ आहेत.
‘पोश्टर बॉईज’ फेम अनिकेत विश्वासरावची भेट
‘पोश्टर बॉईज’ फेम अनिकेत विश्वासराव २८ डिसेंबरला ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’अंतर्गत अंधेरीतील ‘धि रेमंड शॉप’ आणि गोरेगावच्या ‘एस. एम. मोटर्स’ भेट देणार आहे. त्याच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात येईल.
‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या २३ डिसेंबर ते २५ डिसेंबरदरम्यानच्या विजेत्यांची नावे

२३ डिसेंबर
बोहन इराणी (खारेघाट कॉलनी), लतिका परब (अंधेरी), संजय शिंदे (अंधेरी), अरुण सोनार(चारकोप), सेलीनrv10 पेनिल्डा (दादर), सीमा गायकवाड(परेल), शुभदा सार्थये (विक्रोळी), गयाराम पुंडे (परेल), अशोक धिंग (मालाड), नलिनी शिखरे (मुलुंड), रोशनी कांबळे (कांदिवली), अलिशा शेट्टी (बोरिवली).
 २४ डिसेंबर
दीप्ती मुंज (गोरेगाव), रॉयस्टन रॉड्रिग्ज (हिरा नगर), अमोल बोचरे (खारघर), विजया काळे (दादर), दीपक जोगळे (बोरिवली), अनुराधा सावंत (घाटकोपर), राजेंद्र नाईक (वरळी), आदित्य ठाकूर (दादर), यतिन पटोल (भांडुप), समीर पोकळे (वरळी), बी. बी. मनदाम (चेंबूर), विक्रम दळवी (घाटकोपर).
ल्ल साप्ताहिक विजेते
मधु गुजरिया (कुलाबा), उमेश सदाशिव तळभर (माहीम), मुग्धा घरत (दादर पूर्व), विनोद ओवळेकर (अंधेरी पूर्व), जतीन के. शाह (दहिसर पश्चिम).
२५ डिसेंबर
शीला जोशी (बोरिवली), एस. डब्ल्यू. कर्णिक (मुलुंड), श्वेता गुडे (शिवडी), नीलम जाधव (कांदिवली), रमा दीक्षित (दहिसर), स्वाती पाटील (सांताक्रूझ), श्याम बुडाकोटी (नवी मुंबई), अक्षता कांबळी (कांदिवली), विजय साने (नालासोपारा), हेमांगी देऊस्कर (सांताक्रूझ), अनिल मेनेझेस (वसई), गौरव मित्तल (विरार), अचिना पवार (बोरिवली), संदीप म्हात्रे (भांडुप).

Story img Loader