सरत्या वर्षांला निरोप देताना आणि नव्या वर्षांबरोबर नवे कपडे, नवीन वस्तू, नवीन वाहन, नवीन फर्निचर असा सगळा नवलाईचा आनंद लुटण्यासाठी आपण सज्ज असतो. नव्या वर्षांचे नव्या रूपात स्वागत करायचे तर वर्षांच्या शेवटच्या आठवडय़ातली ‘खरेदी’ ही फार महत्त्वाची ठरते. या खरेदीचे औचित्य ‘लोकसत्ता’ने आपल्या वाचकांना उपलब्ध करून दिले आहे. खरेदीचा आनंद आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या ‘सरप्राईज’ भरघोस बक्षिसांची लयलूट अशी सुवर्णसंधी ‘लोकसत्ता’ने १९ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान आयोजित केलेल्या ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या निमित्ताने वाचकांना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून रसिकांचे लाडके कलाकार या ‘शॉपिंग फेस्टिव्हल’निमित्त दुकानांना भेटी देत आहेत. शुक्रवारी या फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी आणि पहिल्यावहिल्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मुलाखतकार संपदा जोगळेकर-कुलकर्णी हिने परळ विभागातील काही दुकानांना भेट दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा