‘गोरे रंग पे न इतना गुमान कर’ हे गाणं म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे अभिनेत्री मुमताज यांचा. ६०- ७० च्या दशकात मुमताज यांनी अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर मुमताज या चित्रपटसृष्टीपासून लांब असल्याचे दिसत आहे. आता मुमताज यांनी चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला होता. यावेळी चाहत्यांशी संवाद साधत असताना त्यांनी चाहत्यांनी एक विनंती केली आहे.
मुमताज यांनी मुलगी तान्या माधवानीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लाइव्ह करत चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी बॉलीवूड संदर्भातील अनेक प्रश्वांवर मुमताझ यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी मुमताझं यांनी लवकर मुंबईत परतणार आहोत असं देखील सांगितलं. या लाइव्हमध्ये एका चाहत्याने मुमताज यांना ‘तुम्ही बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण कधी करणार?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी मजेशीर अंदाजात उत्तर देत म्हटले, ‘बॉलिवूड? मला नाही माहिती. मला नाही वाटत आता मला आवडेल अशी कोणती भूमिका मला मिळेल आणि जर ती मी साकारली तर लोकांना ती आवडेल.’
आणखी वाचा : रितेश देशमुखचा ‘नाच’ पाहून जिनिलिया संतापली, मजेदार Video Viral
दरम्यान, या चॅटिंग सेशनच्या शेवटी मुमताज यांनी आपल्या चाहत्यांना विनंती केली की,”असंच प्रेम माझ्यावर कायम राहू द्या. माझ्या निधनानंतर रडू नका. जसं लता मंगेशकर यांच्या जाण्यानंतर तुम्ही चाहते रडला होतात. मला लक्षात ठेवा.”
आणखी वाचा : सुशांत सिंग राजपुतमुळे दीपिकाचा ‘गहराइयां’ झाला फ्लॉप?
‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटाने मुमताज यांच्या कारकिर्दीला कलाटणी दिली. चित्रपटसृष्टीत नावारुपास येत असतानाच या सौंदर्यवतीचं नाव काही सहकलाकरांशी जोडलं गेलं. संजय खान, फिरोज खान, देव आनंद आणि शम्मी कपूर या कलाकारांसोबत मुमताज यांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. पण, त्यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं ते म्हणजे शम्मी कपूरसोबतच्या बहुचर्चित रिलेशनशिपमुळे. १९७४ मध्ये त्यांनी मयूर माधवानी यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीतूनही काढता पाय घेतला आणि त्या लंडनला स्थायिक झाल्या. सध्याच्या घडीला मुमताज चित्रपटसृष्टीपासून फार दूर असल्या तरीही त्यांचं चाहत्यांच्या मनातील स्थान मात्र कायम आहे.