संजय दत्त तुरुंगामधून बाहेर आला की त्याच्यासोबत मुन्नाभाई सीरिजचा नवा चित्रपट सुरु करण्यात येईल, असे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी म्हटले आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय बाल फिल्म महोत्सवावेळी ते बोलत होते.
राजकुमार हिरानी यांचे ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘३ इडियट्स’ सुपर हिट ठरले होते. त्यांच्या तिसर्‍या चित्रपटापासून मुन्नाभाईचा पुढचा भाग बनणार असल्याच्या बातम्या येत होत्या. चित्रपटाचे नाव ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ असे ठरले होते. त्यात संजय दत्त इंग्रजांना इंग्रजी शिकवताना दाखवले जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, संजय दत्तला तुरुंगवास झाल्यामुळे असे होऊ शकले नाही. राजकुमार हिराणी म्हणाले की, चित्रपटाची कथा तयार असून, केवळ संजय दत्त तुरुंगातून येण्याची आम्ही वाट पाहत आहोत.
बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त पुण्याच्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. याआधी संजय दत्तचे ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ हे चित्रपट सुपरहिट झाल्यामुळे मुन्नाभाई सीरिजच्या तिसऱ्या चित्रपटाची चाहते वाट पाहत आहेत.

Story img Loader