‘मर्डर २’सारख्या बोल्ड चित्रपटात काम केल्याबद्दल आपल्याला अजीबात खंत नसल्याचे बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीनचे म्हणणे आहे. कारण याच चित्रपटामुळे आपल्याला सिनेसृष्टीतील संधी मिळाल्याचे ती सांगते.
‘मर्डर २’सारखा चित्रपट केल्याची मला खंत नाही. तो माझा पहिला हिट चित्रपट होता. मोहित सुरीसोबत काम करण्याची संधी मला यात मिळाली. त्यामुळे माझ्यासाठी अनेक दरवाजे उघडले. माझ्यासाठी त्या चित्रपटात काम करणे एकप्रकारची जोखीम होती. पण जोखीमपूर्ण काम करण्यात एक वेगळी मजा असल्याचे जॅकलीन म्हणाली. २००९ साली प्रदर्शित झालेल्या अलादिन चित्रपटाने जॅकलीनने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
जॅकलीन म्हणाली की, एक अभिनेत्री म्हणून आमच्याकडे गमवण्यासाठी काहीच नसते. लोक तुमचा अभिनय लक्षात ठेवतात आणि त्यावरचं तुम्हाला कामही मिळते, ना की तुमचा चित्रपटाच्या हिट होण्यावर.
लवकरचं जॅकलीन, रणबीर आणि अर्जुन रामपालची प्रमुख भूमिका असलेला ‘रॉय’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा