संगीत क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे ए. आर. रहमान, आज त्यांच्या संगीताने देशालाच तर जगाला वेड लावले आहे. ते ऑस्कर पुरस्काराचे मानकरी आहेत. ‘स्लमडॉग मिलियनर’ चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. तामिळ चित्रपटाचं नव्हे तर हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिल आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतदेखील त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नुकतंच त्यांनी मुलाखतीत ‘आर आर आर’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजमौली यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत ए. आर. रहमान असं म्हणाले, ‘मी जेव्हा मगधीरा चित्रपट बघितला तेव्हाच मला कळले होते हा माणूस ( राजामौली) काय करू शकतात ते, जेव्हा त्यांनी बाहुबली चित्रपट केला आणि तो मी पहिल्यांदा पहिला तेव्हा मी थक्क झालो. तेलगू चित्रपटसृष्टीचा त्यांनी गौरव केला आहे’. तसेच ते पुढी म्हणाले ‘PS १ चित्रपटाचे दिग्दर्शक मणी रत्नम हे माझे खूप चांगले मित्र आहेत. मी त्याच्याबरोबर अनेक वर्ष काम केले आहे’.

या ठिकाणची लोक फार…”; यामी गौतमने सांगितला मुंबईबद्दलचा अनुभव

आर आर आर चित्रपटाचे दिग्दर्शक राजमौली सध्या प्रमोशनसाठी अनेक देशात फिरत आहेत. नुकतेच ते जपानला गेले आहेत. जपानी जनता दाक्षिणात्य चित्रपटांची चाहती असल्याने आता चित्रपट जपानी भाषेत डब केला जाणार आहे. याआधी राजमौली अमेरिकेत चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी गेले होते. ‘आर आर आर’ चित्रपटाला समर्थन देण्यासाठी आता हॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळी पुढे आली आहेत.

‘आर आर आर’ चित्रपट’ हा अॅक्शन चित्रपट आहे. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरसारखे सुपरस्टार या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. आलिया भट, अजय देवगण तसेच आपले मराठमोळे मकरंद देशपांडेसारखे मातब्बर कलाकारही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music composer a r rehman commented on director s s rajamauli on rrr film spg
Show comments