कलाविश्वातील अजय-अतुल ही लोकप्रिय जोडी आहे. त्यांची गाणी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावतात. केवळ मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी गाण्यांमुळे प्रेक्षकांना भुरळ घातली. सध्या अजय-अतुल गाण्यामुळे नाही तर त्यांच्या कृतीमुळे चर्चेत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काही दिवसांपूर्वी ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ हे गाणं गाणाऱ्या एका शाळकरी मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये तो मुलगा आपल्या मधूर आवाजात ‘चंद्रा’ हे गाणं गाताना दिसत होता. जयेश खरे असं त्या शाळकरी मुलाचं नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यात राहणारा आहे. सुमधूर आवाजातील गाणं गातानाचा त्याचा व्हिडीओ अजय-अतुल यांच्यापर्यंत पोहोचला. त्याच्या आवाजाने अजय-अतुल यांनाही भुरळ पाडली आहे. जयेशला अजय-अतुल यांनी चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे.
हेही वाचा >> “लोकलमध्ये मी नेलपेंट, लिपस्टिक विकायचे अन्…”, विशाखा सुभेदारने शेअर केल्या खडतर प्रवासातील आठवणी
हेही वाचा >> “लग्न करायचे म्हणून तो रोज माझ्या घरी…”, रिंकूने सांगितला ‘त्या’ चाहत्याचा भयानक किस्सा
अजय-अतुलने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जयेशबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “रसिकहो, तुमच्यामुळे आम्हाला अस्सल मातीतला कलाकार सापडला…!!! ही आहे आजच्या महाराष्ट्राची ताकद, सर्वांचे मनापासून आभार”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये जयेश अजय-अतुल यांच्यासह गाणं रेकॉर्ड करताना दिसत आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात गाणं गाण्याची संधी अजय-अतुलने जयेशला दिली आहे.
हेही वाचा >> “ती माझ्या आयुष्यात आली आणि…”, अभिनेता संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. “हा अस्सल मातीतला कलाकार viral video ने सापडतो. आणि थेट अजय अतुल यांच्यापर्यंत पोहोचतो. ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमासाठी त्याचं गाणं रेकॉर्ड होतं. इतिहास असाच लिहिला जातो. महाराष्ट्र शाहीर…२३ एप्रिल २०२३…!”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत अजय-अतुल यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.