विश्व सुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्याला तिच्या आयुष्यात साधारण जिवन जगायला आवडते. ऐश्वर्याकडे सगळे असून ही ती जमिनीशी जोडलेली स्त्री आहे. आता संगीतकार आणि गायक विशाल दादलानी ‘सा रे ग म प’ या शोमध्ये सांगितले की ऐश्वर्याने एक-दोन नाही तर तब्बल ३० लोकांना जेवण वाढले होते.
ऐश्वर्याचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चन त्याचा आगामी चित्रपट ‘बॉब बिस्वास’ च्या प्रमोशनसाठी ‘सा रे ग म प’ या शोमध्ये हजेरी लावली होती. त्याच्यासोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह देखील होती. त्याचवेळी शोचा सुत्रसंचालक आदित्य रायने अभिषेकला प्रश्न विचारला की ऐश्वर्या घरात काम करते का? अभिषेक काही बोलण्याआधी विशाल म्हणाला, “मी, ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन एका टुरवर गेलो होतो. यावेळी आमच्यासोबत जवळपास ३० लोक होते. जेव्हा सगळे जेवत होते. त्याचवेळी आणखी एक ग्रुप तिथे जेवायला आला. एकावेळी इतक्या लोकांना वेटर्स जेवन वाढू शकत नव्हते. तेवढ्यात ऐश्वर्याने आम्हाला सगळ्यांना जेवण वाढायला सुरुवात केली. “
आणखी वाचा : आमिरसोबत लग्नाच्या चर्चांवर अखेर फातिमाने सोडलं मौन म्हणाली…
पुढे विशाल म्हणाला, “अशा प्रोग्राममध्ये आमच्यासोबत अनेक लोक असतात. जे लोक जेवण वाढतात. तेव्हा ऐश्वर्याने त्यांना खडसावून सांगितल की तुम्ही जेवण करा आणि मी वाढते. ऐश्वर्याने हे सगळं प्रेमाने केले होते. त्या दिवशी आम्हाला आश्चर्य झाले. कारण सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर तिने त्यांना मिठाई वाढली आणि नंतर सगळ्यात शेवटी ती जेवायला बसली. आम्ही ऐश्वर्याला अनेक वर्षांपासून ओळखतो, ती अशीच आहे. आम्ही तो दिवस कधीच विसरू शकत नाही, कारण ऐश्वर्या राय बच्चनने आम्हाला जेवण वाढले होते.”
आणखी वाचा : “…म्हणून मला माझे दागिने विकावे लागणार”, किरण खेर यांनी केले वक्तव्य
पुढे अभिषेक म्हणाला, “ती अप्रतिम आहे. ऐश्वर्याला भारतीय संस्कार माहित आहेत. ती आता या सगळ्या गोष्टी आमच्या मुलीलासुद्धा शिकवत आहे. तिने जमिनीशी जोडून राहिले पाहिजे.”