लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट नुकतंच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. रोखठोक संवाद आणि जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे यामुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत आहेत. नुकतंच प्रसिद्ध गायक, लेखक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डॉ. सलील कुलकर्णी हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच सलील कुलकर्णी यांनी प्रवीण तरडेंसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देताना त्यांनी प्रवीण तरडे यांची कौतुकाने पाठ थोपटली आहे. त्यासोबतच ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचेही विशेष कौतुक केले आहे.

“सरसेनापती हंबीरराव हा दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांच्या तुलनेत…”, प्रवीण तरडे यांचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

डॉ. सलील कुलकर्णी यांची पोस्ट

“प्रवीण विठ्ठल तरडे .. त्रिवार अभिनंदन ..

मराठी चित्रपटाचा परीघ मोठा केला आमच्या या मित्राने … एका वेळी सगळ्या थिएटर्स ला दोन भव्य चित्रपट एका दिग्दर्शकाचे असणं ही एक अद्भुत घटना आहे .आमच्या मैत्रीचा प्रवास १९९८ – १९९९ पासूनचा .. प्रवीणला कोणतीही गोष्ट करतांना पाहिली कि एक गोष्ट जाणवते .. हा माणूस त्या त्या वेळेला तिथे तिथे १०० नाही २००% असतो .

लिखाण , दिग्दर्शन , अभिनय , डबिंग , रेकॉर्डिंग , गप्पा , मैत्री .. सगळीकडे भरभरून जगणारा प्रवीण .. ग्रेसच्या कवितेपासून .. क्रिकेट पर्यंत आणि चित्रपट तर त्याचा श्वास आहे ..रंगमंचावर त्याची भक्ती आहे म्हणूनच .. कास्टिंग करतांना त्याचा पहिला प्रश्न असतो .. तुम्ही थिएटर केलंय का ?

आपल्या मित्रांना बरोबर घेऊन यशाची प्रत्येक पायरी चढणं हा गुण सुद्धा तितकाच मोठा .. ” धर्मवीर ” पाहून त्याच्यामधल्या दिग्दर्शकाला सलाम केला .. आणि ” सरसेनापती हंबीरराव ” पाहून एक मित्र म्हणून .. एक मराठी कलाकार म्हणून मन अभिमानाने भरून आलं ..

आता मराठी चित्रपट सुद्धा साऊथ इंडियन फिल्म्स सारखा भव्य दिसतोय .. इतर भाषेतले दिग्दर्शक सुद्धा आता ” प्रवीण तरडे” सारखे चित्रपट करा असं म्हणतील ह्याची खात्री वाटते .

प्रवीण .. मित्रा .. खूप अभिमान आहे तुझ्या या प्रवासाबद्दल .. प्रत्येक टप्प्यावर कष्ट घेत इथपर्यंत आला आहेस हे तुझ्या सगळ्या मित्रांना ठाऊक आहे .. नवीन लोकांच्या पाठीशी उभा राहतोस तेव्हा तू त्यांच्यात तुझे struggle चे दिवस पाहतोस .. हे सुद्धा जाणवतं … तुझ्यातल्या कलाकाराला वंदन आणि मित्राला एक घट्ट मिठी .. !!”, अशी पोस्ट सलील कुलकर्णी यांनी केली आहे.

“…म्हणूनच बाप झाल्यापासून तू वेड्यासारखा वागतोय”, मिनाक्षी राठोडने पतीसाठी केलेली पोस्ट चर्चेत

दरम्यान सलील कुलकर्णी यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात विक्रमी कलेक्शन केले होते. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ८.७१ कोटींची कमाई केली आहे. अनेक चित्रपट समीक्षक, प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. या चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रवीण तरडे साकारली आहे.