मुंबईसह महाराष्ट्रात करोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसतोय. याचा मोठा फटका बॉलिवूडला देखील बसतोय. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली आहे. अभिनेता रणबीर कपूरनंतर, संजय लीली भन्साळी, आमिर खान, कार्तिक आर्यन, मिलिंद सोमण अशा अनेकांना करोनाचा सामना करावा लागला आहे.
यातच आता बॉलिवूडचे दिग्गज संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बप्पी लहरी यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एनआयएच्या वृत्तानुसार बप्पी लहरी यांच्या टीम कडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. बप्पी लहरींना करोनाची लागण झाल्याचं वृत्त आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून काळजी व्यक्त केली जातेय. तसचं त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे. बप्पी लहरी यांच्या कुटुंबीयांनी गेल्या काही दिवसात बप्पीदा यांच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करुन घेण्याची विनंती केली आहे.
Veteran music composer Bappi Lahiri has been admitted to Mumbai’s Breach Candy Hospital after testing positive for #COVID19, confirms the singer’s spokesperson
(Picture source: Bappi Lahiri’s Instagram account) pic.twitter.com/FMwe1PVsfq
— ANI (@ANI) March 31, 2021
बप्पी लहरी यांची मुलगी रेमा बंसल हिच्या सांगण्यानुसार बप्पी लहरी यांनी सर्व प्रकारची काळजी घेतली होती. मात्र तरी त्यांना करोनाची लागण झाली. वाढत्या वयाचा विचार करता त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा विचार केला. यासाठीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गौहर खानने फोटोग्राफर्सचे हात केले सॅनिटाईझ, व्हिडीओ व्हायरल
गेल्या काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 17 मार्चला बप्पी लहरी यांनी एक पोस्ट केली होती. यात त्यांनी करोना प्रतिबंधात्मक लसीसाठी नोदणी केल्याचं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे करोनाची लस घ्यावी यासाठी चाहत्यांना आवाहन केलं होतं.