यंदाचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना जाहीर करण्यात आला आहे. संगीत, नृत्य आणि नाटक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणआ-या कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येते.
पुरस्कार जाहीर झाल्यावर नाटककार एलकुंचवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मराठी माणसांना आनंद झाला असेल तर त्याचा मलाही आनंद आहे, अशी प्रतिक्रिया एलकुंचवार यांनी लोकसत्ताच्या प्रतिनिधीसमोर व्यक्त केली.
नाटककार महेश एलकुंचवार यांच्यासोबतच ज्येष्ठ शास्त्रीय नर्तिका कनक रेळे यांना ‘अकादमी रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर गायिका वीणा सहस्रबुद्धे, लास्य नृत्य अकादमीच्या संस्थापिका राजश्री शिर्के, नाट्य दिग्दर्शक कमलाकर सोनटक्के, ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर आणि लोककला प्रकारात थाळीनृत्य कलावंत शेख रियाजुद्दीन ऊर्फ राजूबाबा यांनाही पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तीन लाख रुपये रोख, ताम्रपट असे ‘अकादमी रत्न’ पुरस्काराचे स्वरूप आहे. तर ‘अकादमी’ पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख आणि ताम्रपट असे आहे.

Story img Loader