विवधतेमध्ये एकता हा प्रकार आपल्या भारतात हमखास पाहायला मिळतो. कित्येक विदेशी आक्रमणकर्त्यांनी आपल्या देशावर हल्ले करत आपली प्राचीन सभ्यता नष्ट करायचा पूर्णपणे प्रयत्न केलं, परंतु तरी आजही आपली संस्कृती व प्राचीन सभ्यता आपण जपली आहे. याचं एक मोठं उदाहरण आपल्याला २२ जानेवारी रोजी आयोध्येच्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळाले.
या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बऱ्याच मोठ्या सेलिब्रिटीजनी तसेच मनोरंजनविश्वातील वेगवेगळ्या कलाकारांनी हजेरी लावली. रामानंद सागर यांच्या अजरामर ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका निभावणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. याचदरम्यान विमानतळावरील अरुण गोविल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे अरुण गोविल हे पुन्हा चर्चेत आले आहेत.
आणखी वाचा : शोएब मलिकमध्ये नेमकं काय पाहिलं? शाहरुखच्या प्रश्नाला उत्तर देतानाचा सानिया मिर्झाचा जुना व्हिडीओ चर्चेत
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ची क्रेझ आजही कायम आहे. याच्याशी संबंधित कलाकार जिथे जिथे दिसतात तिथे सर्वजण गर्दी करून त्यांचे आशीर्वाद घेऊ लागतात. रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल असो की सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया असो. ९० च्या दशकात त्यांची घराघरात पूजा केली जात होती. आणि आताही असेच दृश्य पाहायला मिळत आहे.
नुकत्याच व्हायरक झालेल्या एका व्हिडीओमध्ये तर एक मुस्लिम कुटुंबीय अरुण गोविल यांच्याबरोबर सेल्फी काढताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुस्लिम माणूस विमानतळावर अरुण गोविल यांच्यासह आपल्या पत्नी आणि मुलाचे फोटो काढताना दिसत आहे. या व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. “धर्माने बाटलेले पण अरुण गोविल यांनी एकत्र जोडलेले” अशा कॉमेंट करत लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका यूझरने कॉमेंट करत लिहिलं की, “मुस्लिम बांधवाची श्रीराम यांच्याप्रती असलेली भक्ती फारच अद्भुत आहे.” सोशल मीडियावर या व्हिडीओची जबरदस्त चर्चा आहे. असंही सांगितलं जात आहे की हा जुना व्हिडीओ आहे.