बॉलिवूडचा बजरंगी भाईजानचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. या चित्रपटातून अभिनेत्री महिमा मकवाना हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बालकलाकार म्हणून महिमाने छोट्या पडद्यापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिने अनेक मालिकेत काम केले आहे. मात्र सलमान खानच्या ‘अंतिम’ चित्रपटात काम केल्यानंतर तिचे आयुष्य एका रात्रीत बदलून गेले.
गेल्या काही दिवसांपासून महिमाला अनेक चित्रपट आणि वेब शो साठी ऑफर्स येत आहे. नुकतंच तिने एका मुलाखतीत तिची कारकिर्द, चित्रपट आणि सुरुवातीच्या खडतर दिवसांबद्दल अनेक खुलासे केले. अंतिम या चित्रपटात तिने मंदा ही व्यक्तिरेखा साकारली होती. यात ती कशाप्रकारे स्वाभिमानाची भूमिका साकारते? कशी प्रत्येक प्रसंगाला तोंड देते याबाबत सांगितले आहे.
“माझी आई माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मी फक्त ६ महिन्यांची होते आणि माझा भाऊ ९ वर्षांचा होता. माझी आई एक सामाजिक कार्यकर्ती होती. ज्या प्रकारे त्यांनी मला आणि माझ्या भावाला प्रतिकूल परिस्थितीत वाढवले त्यात तिचे कणखर व्यक्तिमत्व महत्त्वाचे होते,” असे तिने सांगितले.
‘सिंगल फादर’ व्हायचंय हे आई-वडिलांना सांगितल्यावर काय होती प्रतिक्रिया? तुषार कपूर म्हणतो…
“एक सशक्त स्त्री म्हणून मी माझ्या आईला आदर्श मानते. आपण ज्या समाजात राहतो तिथे लोक स्त्रियांकडे तुच्छतेने पाहतात आणि विशेषत: ज्या स्त्रियांना पती नाही, जे सिंगल पालक आहेत त्यांच्यासाठी तर असंख्य आव्हाने असतात. अभ्यासासोबतच करिअर घडवण्याचे बळ मला माझ्या आईकडून मिळाले. वयाच्या अवघ्या ९ ते १० वर्षापासून मी बालकलाकार म्हणून टीव्हीवर काम करायला सुरुवात केली. मी नेहमीच माझा स्वाभिमान आणि हक्कांबद्दल जागरूक असते,” असेही ती म्हणाली.
“आज मी जे काही आहे, त्यात माझ्या चाळीत झालेल्या संगोपनाचा मोठा वाटा आहे, असा माझा विश्वास आहे. ते दिवस मी कधीच विसरु शकत नाही. मी आजही तिथे जाते. मी दहिसरमधील एका चाळीत राहायची. त्या चाळीत मी लहानाची मोठी झाली, हे सांगायला मला अजिबात लाज वाटत नाही.” असेही तिने यावेळी म्हटले.
“मी लोकांना एवढेच सांगेन की जर मी माझा ठसा उमटवू शकते, तर तुम्हीही ते करू शकता. जेव्हा तुम्ही चाळीत राहता तेव्हा तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांच्या अगदी जवळ असता. सण असो किंवा घरातील भांडणे, ते तुमच्या कुटुंबासारखे असतात. मी माझ्या शेजाऱ्यांसोबत साजरी केलेली दिवाळी आणि होळी मला अजूनही आठवते. चाळीतच मी पैशाची आणि मूल्यांची कदर करायला शिकले. आज मी माझ्या आईच्या मेहनतीच्या जोरावर इथपर्यंत पोहोचू शकले,” असेही तिने यावेळी सांगितले.
Zombivli Trailer : डोंबिवलीत झोंबींचा थरार, अमेय वाघच्या ‘झोंबिवली’चा ट्रेलर पाहिलात का?
“अंतिम चित्रपटाच्या शूटींगच्या दोन दिवस आधी कास्ट झालेली मी शेवटची कलाकार होती. या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते आणि तेव्हा मला सलमान खान प्रॉडक्शनकडून ऑडिशनसाठी बोलवण्यात आले. यावेळी महेश सरांनी माझे ऑडिशन घेतले. त्यापूर्वी मी अनेक चित्रपटासाठी ऑडिशन दिल्या होत्या. मात्र त्यावेळी मला सतत नकार मिळत होता. या चित्रपटाचे ऑडिशन देऊन मी नेहमीप्रमाणे घरी आले. संध्याकाळी मला फोन आला आणि सांगितले की माझी निवड झाली आहे. मला माझ्या भूमिकेच्या तयारीसाठी फक्त दोन दिवस मिळाले. खरे सांगायचे तर, ट्रेलर लॉन्च होईपर्यंत माझा विश्वास बसत नव्हता की ते खरे आहे,” असेही तिने सांगितले.