बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा तीन वर्षांचा मुलगा आझादने ‘पीके’ चित्रपट पाहिल्यापासून तो आमिरला ‘पीके’ म्हणूनच हाक मारू लागला असल्याची माहिती खुद्द आमिरने दिली. बहुचर्चित दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या आगामी ‘पीके’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आमिरच्या कुटुंबियांसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी आमिरने मुलगा आझाद, मुलगी इरा, अम्मी आणि किरणसोबत ‘पीके’ चित्रपट पाहिला. त्यानंतर आमिरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ‘पीके’ पाहून आपले कुटुंबिय भारावून गेले असल्याचे म्हटले आहे. तसेच ‘पीके’ चित्रपट त्याच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट असल्याचीही प्रतिक्रिया कुटुंबियांनी दिली. मुलगा आझाद तर चित्रपट पाहिल्यापासून आपणास ‘पीके’ म्हणूनच हाक मारू लागला आहे. इतकेच नव्हे तर, चित्रपटातील माझ्या नृत्याची कॉपी देखील तो करू लागला असल्याचे आमिरने म्हटले आहे. आपला मोठा मुलगा जुनैद लॉस एंजलिसमध्ये असल्यामुळे तो यावेळी उपस्थित नव्हता, त्यामुळे जुनैदची कमतरता जाणवल्याच्याही भावना आमिरने ट्विटरवर व्यक्त केल्या. तरीसुद्धा येत्या १९ तारखेला जुनैदला देखील पीके पाहता येणार असल्यामुळे आनंद असल्याचे आमिरने म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा