नागिन २ फेम अभिनेत्री अदा खानचे डेबिट कार्ड चोरीला गेले. चोरांनी तिच्या अकाऊंटमधून २ लाख रुपये काढले. अदा म्हणाली की, तिच्या मोबाइलवर डेबिट कार्डमधून २४ हजार रुपये काढल्याचा पहिला मेसेज आला. हा मेसेज पाहिल्यावर तिला धक्काच बसला. तिने पर्समध्ये डेबिट कार्ड शोधले असता तिला सापडले नाही. आपले कार्ड कोणीतरी चोरले याची तिला लगेच कल्पना आली. यादरम्यान तिला पैसे काढल्याचे आणखी ४ मेसेज आले. चोरांनी तिच्या अकाऊंटमधून एकूण २ लाख रुपये काढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अदाने लगेच कॉल सेंटरला फोन करुन तिचे कार्ड चोरीला गेल्याचे सांगितले आणि कार्ड ब्लॉक केले. अदाने सांगितले की, या प्रकरणात तिला पोलिसांनी आणि बँकेने फार मदत केली. याआधी अभिनेत्री दिलजीत कौर आणि अभिनेता नकुल मेहता यांच्यासोबतही असेच काहीसे घडले होते. दोघांचेही डेबिट कार्ड चोरीला गेले होते.