दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. लता दिदींच्या कुटुंबाचंही त्यांच्या जाण्याने फार मोठं नुकसान झालं आहे. लता दिदींची बहीण आशा भोसले नेहमीच त्यांच्याबद्दल बोलताना भावुक झालेल्या दिसतात. अलिकडेच लता दिदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘नाम रह जाएगा’ हा शो सुरू करण्यात आला आहे. ज्याच्या आगामी एपिसोडमध्ये आशा भोसले बहीण लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली वाटताना दिसणार आहेत. याच कार्यक्रमात त्यांनी आपल्या बहिणीच्या काही आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.
आशा भोसले आपल्या बहिणीसोबतच्या क्षणांना उजाळा देत म्हणाल्या, “लता दिदींनी एकदा कुठेतरी वाचलं होतं की जर तुम्ही तुमच्या आई- वडिलांचे पाय धुवून ते पाणी प्यायलं तर तुम्ही आयुष्यात खूप यशस्वी व्हाल. तेव्हा त्यांनी मला पाणी आणण्यास सांगितंल. त्यांनी एक ताट घेतलं आणि आई- वडिलांचे पाय धुतले आणि आम्हा सर्व भावंडांना ते पाणी पिण्यास सांगितलं. त्यांच्या मते यामुळे आम्ही आयुष्यात यशस्वी होऊ. मला वाटतं आम्ही यामुळेच आज यशस्वी आहोत.”
आणखी वाचा- “त्या दोन महिन्यात माझी मुलगी…” स्तनाच्या कर्करोगाचा अनुभव सांगताना महिमा चौधरी झाली भावूक
आशा भोसले पुढे म्हणाल्या, “माझ्या बहिणी कधीच कोणती गोष्ट मागितली नाही. त्या एका सर्वसाधारण आयुष्य जगत होत्या. सुरुवातीला दिदी ८० रुपये महिना कमावयच्या. आम्ही ५ माणसं होतो आणि तेवढ्याच पैशात आम्हाला घरखर्च चालवावा लागत असे. आमच्या बरेच नातेवाईक यायचे अशावेळीही दिदी काहीच बोलत नसे. त्यांना सर्वांसोबत एखादी गोष्टी शेअर करण्यात आनंद असायचा. अनेकदा अशी वेळ यायची की आम्ही २ आण्यांचे कुरमुरे विकत घ्यायचो आणि चहासोबत ते खाऊन झोपून जात असू.”
आणखी वाचा- “स्त्रियांनी शरीर दाखवलं तर…” ‘Aashram 3’ फेम ईशा गुप्ताचं बोल्ड विधान चर्चेत
लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देताना आशाताई म्हणाल्या, “आम्हाला कोणालाच काही तक्रार नव्हती. तो त्यावेळी एक सुंदर काळ होता. आजही यावर विश्वास बसत नाहीये की लता दिदी आपल्यात नाहीयेत. आजही मला वाटतं की, दिदीचा कॉल येईल आणि ती म्हणेल आशा तू कशी आहेस?” दरम्यान लता दिदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सोनू निगम, शंकर महादेवन, अलका याज्ञनिक, कुमार शानू, अमित कुमार यांच्यासह जवळपास १८ प्रसिद्ध भारतीय गायक सहभागी होणार आहेत.