मराठमोळी अमृता खानविलकर आणि तिचा पती हिमांशु मल्होत्रा यांनी ‘नच बलिए ७’ची ट्रॉफी पटकाविली. नच बलिएच्या अंतिम फेरीत नंदीश संधू-रश्मी देसाई, उपेन पटेल-करिश्मा तन्ना आणि मयुरेश वाडकर-अजीशा शाह या जोड्यांचा अमृता-हिमांशुने पराभव केला.
Nach-Baliye-1
प्रेक्षकांनी केलेल्या भरपूर मतांच्या जोरावर अमृता आणि हिमांशुने या तीन जोड्यांना पछाडत विजय मिळवला. गेली दहा वर्षे प्रेमसंबंधात असलेल्या अमृता आणि हिमांशुने जानेवारीमध्येच विवाह केला होता. नच बलिये या डान्स रियालिटी शोच्या पहिल्याच पर्वात मराठमोळ्या सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांनी ठसा उमटवला होता. या जोडीने पहिल्याच पर्वात विजय मिळवला. त्यानंतर या रियालिटी शोच्या यंदाच्या सातव्या पर्वात पुन्हा एकदा अमृताने मराठीचे झेंडा रोवला आहे.

Story img Loader