सलमान खानच्या आगामी ‘मेंटल’ चित्रपटामध्ये राज बब्बर यांची पत्नी नादिरा सलमानच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबाबत अधिक माहिती कळू शकलेली नाही. नादिरा या प्रतिभावान नाट्यकलाकार असून, यापूर्वी २००४ मध्ये आलेल्या ऐश्वर्याच्या ‘ब्राईड अॅण्ड प्रिज्युडीस्’ आणि एम.एफ.हुसेन यांच्या ‘मिनाक्षी – अ टेल ऑफ थ्री सिटीज’ चित्रपटांमधे त्यांनी काम केले होते.
सलमानच्या अलीकडील चित्रपटांमध्ये बब्बर परिवाराचा सहभाग राहिला आहे. ‘बॉडिगार्ड’ चित्रपटात राज बब्बर यांनी करिनाच्या वडिलांची तर आर्य बब्बरने’ ‘रेडी’ चित्रपटात खलनायकाची भूमिका केली होती.

Story img Loader