दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नागा चैतन्य हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आणि समंथाच्या घटस्फोटामुळे चर्चेत होता. त्यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. दरम्यान, घटस्फोटाच्या बातमीत आता नागा चैतन्य आणि दाक्षिणात्या लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या साखरपुड्याची चर्चा सुरु झाली आहे.
नागा चैतन्य आणि अनुष्काचा साखरपुडा ही बातमी आश्चर्यात पाडणारी आहे. कारण अनुष्का आणि प्रभासने लग्न करावे अशी त्यांच्या चाहत्याची इच्छा आहे. खरतरं त्यांच्या साखरपुड्याची चर्चा ही आता नाही तर खूप आधीची आहे. एका मुलाखतीदरम्यान, नागार्जुन यांनी भूतकाळात घडलेल्या या गोष्टीचा खुलासा केला आहे.
आणखी वाचा : बिग बॉस मराठी ३ : मीरा आणि सोनालीमध्ये झाली हाणामारी?
नागा चैतन्य आणि अनुष्का शेट्टी हे दोघेही चांगले मित्र आहेत. मात्र, अचानक एकदा त्यांच्या साखरपुड्याची चर्चा ही सुरु झाली होती. त्यावेळी नागार्जुन हे स्वित्झर्लंडमध्ये होते. जेव्हा त्यांना ही बातमी मिळाली तेव्हा त्यांनी लगेच त्यांच्या मुलाला म्हणजे नागा चैतन्यला फोन केला आणि म्हणाले, “अरे तू काल साखरपुडा केलास, मला सांगितल नाहीस.” वडील मस्करी करत आहेत हे ऐकताच नागा चैतन्य म्हणाला, “हो का.., खरंच” आणि त्यानंतर ते दोघेही हसू लागले. फक्त नागार्जुनच नाही तर स्वत: नागा चैतन्य आणि अनुष्का या दोघांनाही त्यांच्या साखरपुड्याची बातमी ऐकून धक्का बसला होता.