दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून समांथा रुथ प्रभू ओळखली जाते. समांथा गेल्या काही दिवसांपासून पती नागा चैतन्यसोबत विभक्त झाल्यामुळे चर्चेत होती. ४ वर्षांच्या संसारानंतर समांथा आणि नागा चैतन्यने घटस्फोट घेतला आहे. दरम्यान, आता नागा चैतन्यचा व्हायरल झालेला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विभक्त होण्या मागचं कारण समजल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
नागा चैतन्यचा हा व्हिडीओ एका मुलाखतीतला आहे. या मुलाखतीत नागा चैतन्य बोलतो की जो कोणी आपल्या कुटुंबाला त्रास देईल, तो ते सहन करणार नाही. मी सर्व प्रकारच्या भूमिका साकारू शकतो. पण, त्या भूमिकांचा माझ्या कुटुंबावर आणि आमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होऊ नये याची मी नेहमीच काळजी घेतो. माझ्या कुटुंबातील सदस्यांना लाज वाटेल अशा भूमिका मी स्वीकारणार नाही.”
आणखी वाचा : लग्नाला होकार देण्यापूर्वी कतरिनाने विकीसमोर ठेवली होती ‘ही’ एक अट
आणखी वाचा : लग्नानंतर अंकिताला पती विकीने भेट म्हणून दिलं ५० कोटींच ‘हे’ गिफ्ट
दरम्यान, नागा चैतन्यचा हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते याचा संबंध त्याच्या आणि समांथाच्या घटस्फोटाशी जोडत आहेत. दरम्यान, जेव्हा या दोघांचा घटस्फोट झाला तेव्हा अशा चर्चा होत्या की नागा चैतन्यच्या घरच्यांना समांथाचे चित्रपटात बोल्ड सीन देणे पसंत नव्हते. तर समांथाने फॅमिली मॅन २ या सीरिजमधून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. या सीरिजमध्ये समांथाचे अनेक बोल्ड सीन पाहायला मिळाले आहेत. तर या नंतरच त्या दोघांमध्ये दुरावा आला असे म्हटले जाते. त्या दोघांची २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाच्या सेटवर ओळख झाली होती. नागा आणि समांथा बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये लग्न केले.