Sobhita Dhulipala and Naga Chaitanya Engagement Date : दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टार अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री सोभिता धुलीपाला यांचा साखरपुडा आज ( ८ ऑगस्ट ) पार पडला आहे. नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. नागा चैतन्यच्या हैदराबाद येथील राहत्या घरी हा कार्यक्रम पार पडला. अभिनेते नागार्जुन यांनी दोघांचे एकत्र फोटो शेअर करत याखाली खास कॅप्शन लिहिलं आहे.

नागार्जुन मुलाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहितात, “माझा मुलगा नागा चैतन्य आणि सोभिता धुलीपाला यांचा साखरपुडा आज सकाळी ९ वाजून ४२ मिनिटांनी आमच्या घरी पार पडला. सोभिताचं आमच्या कुटुंबात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. तुम्हा दोघांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा! 8.8.8 म्हणजेच अनंत प्रेमाची सुरुवात…” नागार्जुन यांच्या कॅप्शनने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये त्यांनी ‘8.8.8’ असा उल्लेख केल्याने याचा नेमका अर्थ काय याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे.

Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Tuljabhavani Devi, Shakambhari Navratri festival,
धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास ७ जानेवारीपासून प्रारंभ
Naga Chaitanya Sobhita Dhulipala Visit Temple
Video : लग्नानंतर नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला निघाले देवदर्शनाला; नागार्जुन होते सोबतीला, व्हिडीओ आला समोर

हेही वाचा : नागा चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलीपालाशी केला साखरपुडा, नागार्जुन यांनी फोटो केले शेअर

साखरपुड्यासाठी ८ ऑगस्ट तारीख निवडण्यामागे आहे खास कारण

नागा चैतन्य व सोभिता ( Sobhita Dhulipala and Naga Chaitanya ) यांनी साखरपुडा करण्यासाठी ८ ऑगस्ट या दिवसाची निवड करण्यामागे काही विशेष कारणं आहेत. ‘8.8.8’ म्हणजेच, ‘आजची तारीख ८, ऑगस्ट हा आठवा महिना आणि २०२४ या वर्षाची बेरीज केल्यास ८ येते’ त्यामुळे अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. याबद्दल डॉ. नीती कौशिक यांनी माहिती दिली आहे. त्या अध्यात्माविषयी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर माहिती देत असतात. त्या सांगतात, “ऑगस्ट महिन्यात एक ज्योतिषीशास्त्रीय घटना घडते याला ‘लायन गेट पोर्टल’ म्हणून ओळखलं जातं. हे एक खगोलीय संरेखन आहे यामुळे पृथ्वी, सिरियस तारा आणि ओरियन नक्षत्र एका रांगेत येतात. ‘लायन गेट पोर्टल’ हे सिंह राशीशी संबंधित आहे. याशिवाय सिरियस हा आकाशातील सर्वात तेजस्वी तारा आहे. आजचा दिवस संख्याशास्त्र व ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचा आहे यादिवशी वैयक्तिक वाढ होण्यास मदत होते…आपण ज्या गोष्टी मॅनिफेस्ट करतो त्या पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.”

हेही वाचा : “तुझ्या सगळ्या बिझनेसची…”, प्राजक्ता माळीच्या वाढदिवशी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची खास पोस्ट

सोभिता आणि चैतन्य ( Sobhita Dhulipala and Naga Chaitanya ) यांच्या साखरपुड्याला केवळ जवळचे कुटुंबीय व काही मोजकी मित्रमंडळी उपस्थित होती. यापूर्वी नागा चैतन्यचे समंथाशी लग्न झाले होते. २०१७ मध्ये दोघंही विवाहबंधनात अडकले होते. परंतु, २०२१ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर सोभिता आणि नागा यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली.

Sobhita Dhulipala and Naga Chaitanya
नागा चैतन्य व सोभिता यांचा साखरपुडा ( Sobhita Dhulipala and Naga Chaitanya )

२०२१ नंतर नागा आणि सोभिता ( Sobhita Dhulipala and Naga Chaitanya ) यांना एकत्र परदेशात देखील फिरताना पाहण्यात आलं होतं. परंतु, दोघांनीही त्यांच्या नात्याची अधिकृतपणे घोषणा केलेली नव्हती. अखेर नागार्जुन यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चैतन्य आणि सोभिता यांच्या साखरपुड्याची माहिती सर्वांना दिली. आता हे दोघं विवाहबंधनात केव्हा अडकणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Story img Loader