Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding: गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री सोभिता धुलीपालाच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून उद्या, ४ डिसेंबरला दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे सध्या सगळ्यांचं लक्ष नागा चैतन्य आणि सोभिता धुलीपालाच्या लग्नाकडे आहे. अशातच दोघांच्या लग्नातील गेस्ट लिस्ट समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागा चैतन्य ( Naga Chaitanya ) आणि सोभिताचं लग्न दाक्षिणात्य रितीरिवाजानुसार होणार आहे. लग्नात दोघं आपल्या पूर्वाजांचा वारसा जपणार आहेत. नागा चैतन्याच्या आजोबांनी म्हणजेच नागेश्वर राव यांनी खरेदी केलेल्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये दोघं लग्नगाठ बांधणार आहेत. १९७६ साली नागाच्या आजोबांनी हा स्टुडिओ खरेदी केला होता. ही २२ एकर जमीन होती; जी नागेश्वर राव यांनी ७५००-८५०० रुपये प्रति एकर या दराने खरेदी केली होती.

हेही वाचा – श्रद्धा कपूरने जुहूमध्ये भाड्याने घेतलं आलिशान अपार्टमेंट, महिन्याला एक-दोन नव्हे तर ‘इतकं’ लाख भाडं

डेक्कन हेराल्डच्या माहितीनुसार, ज्या जमिनीवर स्टुडिओ बांधला गेला त्या संपूर्ण जमिनीची किंमत १.५ ते १.८ लाख रुपये होती. माध्यमांच्या वृत्तानुसार, अन्नपूर्णा स्टुडिओच्या जमिनीची आजची किंमत ३० कोटी रुपये प्रति एकर आहे. त्यानुसार आता या आलिशान स्टुडिओची किंमत ६५० कोटी रुपये आहे. याच आलिशान स्टुडिओमध्ये ४ डिसेंबरला नागा ( Naga Chaitanya ) आणि सोभिताचं लग्न होणार आहे.

हेही वाचा – स्वप्नील जोशी आता डॅशिंग अंदाजात झळकणार, म्हणाला, “माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा…”

‘इंडिया टूडे’च्या वृत्तानुसार, दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह नागा ( Naga Chaitanya ) आणि सोभिताच्या लग्नाला हैदराबादमध्ये उपस्थित राहणार आहे. तसंच प्रभास, एस.एस. राजमौली यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी आपल्या कुटुंबासह हा शाही लग्नसोहळ्याला हजर राहणार आहेत. पण, अद्याप गेस्ट लिस्टबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा – “जितकं आपण या अभिनेत्रीला…”, चिन्मय मांडलेकरने निवेदिता सराफांचं भरभरून कौतुक करत केली खंत व्यक्त, म्हणाला…

दरम्यान, सोभिता धुलीपाला लग्नात कांजीवरमची सिल्क साडी नेसणार आहे, याबाबत निकटवर्तीय सूत्रांनी माहिती दिली आहे. तेलुगू ब्राह्मण रितीरिवाजानुसार नागा ( Naga Chaitanya ) आणि सोभिताचं लग्न होणार असून ८ तास विधी असणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naga chaitanya and sobhita dhulipala wedding allu arjun ss rajamouli to attend guest list revealed pps