दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागाचैतन्य हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. समांथा आणि नागाचैतन्य यांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांनी वेगळं होत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला. या दोघांनी घटस्फोट का घेतला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र वेगळे झाल्यानतंर समांथा आणि नागाचैतन्य एकमेकांशी जोडलेले पाहायला मिळत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे समांथा आणि नागाचैतन्य यांच्या शरीरावर एकमेकांसाठीचे टॅटू पाहायला मिळतात. नुकतंच नागाचैतन्यने त्याच्या शरीरावरील टॅटूंबद्दलचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागाचैतन्य हा लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात नागाचैतन्यसह अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले जात आहे. नुकतंच नागाचैतन्यने एका मुलाखतीत त्याच्या हातावरील टॅटूचा अर्थ सांगितला आहे. तसेच तो टॅटू काढू नका, असा सल्लाही त्याने चाहत्यांना दिला आहे.

समांथाच्या शरीरावर असणाऱ्या तीन टॅटूंचा अर्थ आहे फारच खास, नागाचैतन्यशी आहे थेट कनेक्शन

नागाचैतन्यने त्याच्या डाव्या हातावर मोर्स कोड टॅटू काढला आहे. अनेकदा नागाचैतन्यचे चाहते त्याच्या टॅटूचा अर्थ जाणून न घेताच तो शरीरावर काढतात. मात्र नुकतंच त्याने त्याच्या या टॅटूचा अर्थ काय याबद्दलचा खुलासा केला आहे. यात तो म्हणाला, “हा टॅटू माझ्या लग्नाच्या तारखेसंदर्भातील आहे. मात्र अनेक चाहते त्याचा अर्थ समजून न घेताच तो काढतात. मी जेव्हा कधी माझ्या चाहत्यांच्या शरीरावर हा टॅटू पाहतो, तेव्हा मला फार वाईट वाटते. मी तो त्यांच्या शरीरावर पाहतो तेव्हा मला फार दु:ख होते. त्यामुळे मी हा टॅटू बदलू शकतो, पण मी तसा विचार करत नाही.”

समांथाचा सोशल मीडियाला रामराम? ‘या’ कारणांमुळे चर्चांना उधाण

दरम्यान समांथा आणि नागा चैतन्यने २०१७ मध्ये लग्न केले. गेल्या वर्षी त्यांनी घटस्फोट घेतला आणि विभक्त झाले.समांथा लवकरच ‘यशोदा’, ‘अॅरेंजमेंट ऑफ लव्ह’ आणि ‘शकुंतलम’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. नागाचैतन्य लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नागाचैतन्य हा आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्यासोबत लाल सिंग चड्ढा या चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naga chaitanya reveals his morse code tattoo is his wedding date with samantha ruth prabhu said have not thought of changing it nrp