दाक्षिणात्य चित्रपटाचे सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागाचैतन्य हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. नागाचैतन्य हा लवकरच अभिनेता आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नागाचैतन्य याने तो बॉलिवूडपासून इतके दिवस दूर का होता? याबद्दल प्रश्न विचारला होता. नुकतंच त्याने यावर स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागाचैतन्य आमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात झळकणार आहे. हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नागाचैतन्यला चित्रपटातील त्याची भूमिका, इतके वर्ष हिंदी चित्रपटात काम न करण्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्याने फार स्पष्टपणे उत्तर दिले. त्यासोबत त्याने आमिर खानसोबत चित्रपटात काम करण्याचा अनुभवही सांगितला. नुकतंच नागाचैतन्यने ‘हिंदुस्तान टाईम्स’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला बॉलिवूड पदार्पणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

“जर ती आनंदी असेल तर…”, समांथासोबत घटस्फोटानंतर पहिल्यांदाच नागाचैतन्यने सोडले मौन

तेव्हा तो म्हणाला, “मी गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटाला नकार देत आहे किंवा त्यापासून मुद्दाम दूर राहिलो आहे. मी चेन्नईत लहानाचा मोठा झालो. त्यानंतर हैदराबादला शिफ्ट झालो. त्यामुळे माझी हिंदी फारशी चांगली नाही. मला यामुळे फार असुरक्षित असल्यासारखे वाटते. यामुळेच मला जेव्हा जेव्हा हिंदी चित्रपटांची ऑफर मिळाली तेव्हा तेव्हा मी त्याला नकार दिला. माझी हिंदी ‘दक्षिण भारतीय’ लोकांसारखी आहे, असे मी जेव्हा लोकांना सांगितले तेव्हा लोक दोनदा विचार करायचे.”

“जेव्हा मला लाल सिंह चड्ढा या चित्रपटाची ऑफर मिळाली, तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते की माझी हिंदी इतकी चांगली नाही. त्यावर आमिर सर म्हणाले, मला याबद्दल काहीही अडचण नाही. कारण मी या चित्रपटासाठी दक्षिण भारतीय मुलाचे पात्र करणारा व्यक्तीच्या शोधात आहे. जो मुलगा नंतर उत्तरेकडील भाषाही बोलतो आणि तिथूनच आमचा प्रवास सुरु झाला. मी दक्षिण भारतीय हिंदी भाषेत बोलतो आणि त्यांनाही तेच हवे होते. मी या चित्रपटात हिंदी बोलत असलो तरी मध्ये मध्ये त्यात काही तेलुगू शब्द किंवा स्वर आल्याचे पाहायला मिळतात. पण याबाबत त्यांना काहीही अडचण नव्हती. त्याऐवजी या चित्रपटात तेलुगू भाषेतील काही शब्दांचा प्रयोगही करण्यात आला आहे.” असेही त्याने सांगितले.

घटस्फोटानंतर दोन महिन्यांनी समांथाने दिले सडेतोड उत्तर, “माझ्या आयुष्यात असं काहीतरी…”

आमिर खान आणि करीना कपूर खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. देशातील तब्बल १०० लोकेशनवर या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आहे. अद्वैत चंदन यांचं दिग्दर्शन यांचं दिग्दर्शन असेलल्या या चित्रपटाची पटकथा एरिक रोथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे. हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.