समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटानंतर चैतन्यबरोबर नाव जोडलेली अभिनेत्री शोभिता धूलिपाला सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी शोभिताने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीचा अनुभव सांगितला होता. २०१३ मध्ये ‘मिस अर्थ’ झालेल्या शोभिताला तिच्या वर्णावरून सल्ले दिले जायचे, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. त्यानंतर आता दुसऱ्या मुलाखतीत शोभिता समांथाबद्दल प्रश्न विचारला असता, तिने असे काही उत्तर दिले, ज्यामुळे सर्वांनाच नवल वाटेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“बॉलिवूड बबल” या वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत रॅपिड फायर या खेळात शोभिताला समांथाविषयी प्रश्न विचारण्यात आला. समांथाच्या कोणत्या गोष्टीचे तुला कौतुक वाटते, असा प्रश्न विचारल्यावर शोभिता म्हणाली, “मला वाटते, तिचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. ज्या प्रकारे ती तिचे काम करते ते खूप भारी आहे. जसे की, तिचे चित्रपट पाहिल्यास, ती खूप चांगल्या प्रकारे या सगळ्या गोष्टी हाताळत आहे हे दिसत आहे. त्यामुळे मला ती खूप भारी वाटते.”
आणखी वाचा : “सर्वांची नजर माझ्यावर” शशांक केतकरच्या ‘त्या’ फोटोवर पत्नीची कमेंट, म्हणाली “आणि तुझी…”

आणखी वाचा : “…मग माझ्याच बाबतीत असं का घडावे”, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली “या जन्मी नातेवाईक…”

दरम्यान, शोभिता ‘द नाइट मॅनेजर’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमुळे सध्या चर्चेत आहे. २०१३ पासून करिअरची सुरुवात करणाऱ्या शोभिताने २०१६ मध्ये ‘रमन राघव २.०’ या थिल्रर चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. त्यानंतर आता शोभिता ३० जून रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द नाइट मॅनेजर’ या सीरिजमध्ये अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूरबरोबर काम करताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naga chaitanya rumoured girlfriend sobhita dhulipala talks about samantha ruth prabhu pps