दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व अभिनेता नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाला दीड वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. पण, या दोघांबद्दल सातत्याने चर्चा होत असते. नागा चैतन्य सध्या अभिनेत्री सोभिता धुलिपालाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. तर, समांथा सिंगल आहे. समांथा व नागा चैतन्य यांना बऱ्याचदा त्यांच्या घटस्फोटाबद्दल विचारलं जातं. समांथा त्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देते, पण नागा चैतन्य मात्र बोलणं टाळतो. नुकतंच एका मुलाखतीत त्याने घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल अप्रत्यक्ष उत्तर दिलं आहे.

हेही वाचा – “आम्ही एकत्र आंघोळ करायचो, कारण…”; अश्नीर ग्रोव्हरच्या पत्नीचा खुलासा

‘इरफान व्ह्यूज’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची नागा चैतन्यने उत्तरं दिली. इथे त्याने घेतलेल्या निर्णयांमुळे झालेल्या पश्चातापाबद्दल विचारण्यात आले. यावर अभिनेता म्हणाला, “मला आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप झालेला नाही. मी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा पश्चाताप नाही, कारण प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी धडा राहिली आहे. त्यातून मी काही ना काही शिकलो. मी कदाचित दोन-तीन चांगले चित्रपट नाकारले असतील, पण त्याचाही मला पश्चाताप नाही.” नवभारत टाइम्सने याबद्दल वृत्त दिलंय.

समांथापासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यने सोभिता धुलीपालाला डेट करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच लंडनमधील एका रेस्टॉरंटमधील दोघांचा फोटोही व्हायरल झाला होता. यामध्ये अभिनेत्री कॅमेरापासून चेहरा लपवताना दिसली. तर नागा तिथल्या शेफशी बोलताना दिसला होता.