दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच ‘कॉफी विथ करण सिझन ७’मध्ये झळकणार आहे. या शोचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या प्रोमोमध्ये करणने समांथाला तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारल्याचं दिसतंय. मात्र समांथाने त्याला वेळीत थांबवलं. काही निराश लग्नांसाठी करणच जबाबदार असल्याचा आरोप तिने केल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कॉफी विथ करण सिझन ७’ या शोमध्ये समांथा तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आणि घटस्फोटाबद्दल खुलासा करणार का हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर आहेत. मात्र त्यापूर्वीच अभिनेता नागा चैतन्यने घटस्फोटानंतरचं त्याचं आयुष्य कसं आहे यावर भाष्य केलंय. घटस्फोटानंतर आयुष्यात काही चांगले बदल झाले असल्याचं तो म्हणाला आहे.

हे देखील वाचा: रणबीर कपूरच्या सिनेमांना ऋषी कपूर म्हणायचे ‘फालतू’

नागा चैतन्य लवकरच आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमातून बॉलिवबडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नागा चैतन्य म्हणाला, “करोना महामारीमुळे माझा आयुष्याकडे आणि करियरकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. ‘थँक्यू’ सिनेमामुळे आणि आमिर खानसोबत काम केल्यानंतर मी बरचं काही शिकलो आहे.”

हे देखील वाचा: “यामागचं सत्य…” सुश्मिता सेनने इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या चर्चांवर भाऊ राजीवचा खुलासा

यावेळी नागा चैतन्यने समांथाच नाव न घेता काही गोष्टींचा खुलासा केला. “पहिल्यापेक्षा मी आता माझ्या कुटुंबियांच्या अधिक जवळ आलोय. मी पहिले शांत राहायचो. मी माझं मत मांडू शकत नव्हतो. आता मी माझं मत मांडू शकतो. मोकळेपणाने भावना व्यक्त करू शकतो. एक व्यक्ती म्हणून माझ्यात बदल घडत आहे.”

दरम्यान नागा चैतन्यचं नाव सध्या मेड इन हेवन’ वेब सीरिजमधील अभिनेत्री शोभिता धूलिपालासोबत जोडलं जातंय. अद्याप दोघांनी त्यांच्या नात्याची अधिकृतपणे कबुली दिलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naga chaitanya says life is better now after divorce from samantha ruth prabhu kpw