दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व अभिनेता नागा चैतन्य ही मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी होती. २०१७ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. तर २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोट झाला असला तरीही दोघे त्यांच्या नात्यामुळे सातत्याने चर्चेत असतात. आता नागा चैतन्यने समांथाबद्दलचे त्याचे मत व्यक्त केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागा चैतन्य व समांथा एकमेकांपासून जरी वेगळे झाले असले तरीही त्यांच्यात चांगली मैत्री आहे. अनेक मुलाखतींमध्ये ते एकमेकांबद्दल विचारलेल्या प्रश्नांची खुलेपणाने उत्तर देत असतात. आता नुकत्याच ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत नागा चैतन्याने त्याची पूर्वाश्रमीची पत्नी समांथाबद्दल भाष्य केले आहे. त्याच्या या बोलण्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

आणखी वाचा : घटस्फोटानंतरही समांथा रुथ प्रभूने तसाच ठेवला आहे नागा चैतन्यच्या नावाचा टॅटू, फोटो व्हायरल

नागा चैतन्य म्हणाला, “आम्ही वेगळे राहण्याला आता दोनहून अधिक वर्षे झाली आणि आम्ही अधिकृत घटस्फोट घेऊन एक वर्ष झाले. त्यानंतर आम्ही दोघेही मागचा विचार न करता आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेलो आहोत. समांथा खूप चांगली मुलगी आहे आणि जगातली सगळी सुखे मिळण्यासाठी ती पात्र आहे. पण आम्हाला अनेकदा आमच्या नात्याबद्दल प्रश्न विचारले जातात त्यामुळे आमच्यात संकोच निर्माण होतो. आमच्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल आदर आहे आणि या प्रश्नांमुळे तो कुठे तरी त्याला धक्का पोहोचतो. याचे मला खूप दुःख होते.”

हेही वाचा : समांथा रुथ प्रभूने मुंबईत खरेदी केलं नवं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क

दरम्यान, नागा चैतन्य सध्या अभिनेत्री सोभिता धुलिपालाला डेट करीत असल्याचे म्हटले जात आहे. तर, समांथा सिंगल आहे. लवकरच नागा चैतन्य ‘आगामी कस्टडी’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसेल. तर समांथा ‘सिटाडेल’ या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naga chaitanya shared his views about his ex wife samantha ruth prabhu rnv