दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागाचैतन्य हे गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल अशी ओळख असलेल्या समांथा आणि नागाचैतन्य यांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांनी वेगळं होत असल्याचे जाहीर केले. त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला. या निर्णयानंतर समांथाने अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर याबाबत भाष्य केले. पण नुकतंच पहिल्यांदाच अभिनेता नागाचैतन्य याने घटस्फोटावर मौन सोडत यावर मोकळेपणाने संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागा चैतन्यचा बंगाराजू हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत नागा चैतन्यला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तसेच घटस्फोटबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या सर्व प्रश्नांवर त्याने उघडपणे भाष्य केले.

यावेळी नागा चैतन्य म्हणाला, “हा आमच्या दोघांसाठी पुढील भविष्यासाठी घेतलेला निर्णय होता. आम्ही वेगळे होणे योग्य आहे. आमच्या वैयक्तिक आनंदासाठी तो निर्णय आम्ही घेतला. जर ती (समांथा) आनंदी असेल तर मीही आनंदी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत घटस्फोट हा सर्वोत्तम निर्णय आहे. दरम्यान नागाचैतन्यनचे हे उत्तर ऐकून सर्वजण फार थक्क झाले.

समांथा आणि नागा चैतन्य ऑक्टोबर २०१७ मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले. २००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली.

२०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघं पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे. पण त्या दोघांचा घटस्फोट कोणत्या कारणाने झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. या दोघांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनीही यावर मौन बाळगले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naga chaitanya talk first time about divorce with samantha ruth prabhu nrp