Naga Chaitanya Sobhita Dhulipala Visit Temple : लग्नाआधी आणि नंतरदेखील अनेक विधी आणि समारंभ पार पडतात. लग्न झाल्यावर वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि दोघांनी सुखी संसाराला सुरुवात करावी यासाठी प्रत्येक जोडपे देवदर्शनाला जाते. मग त्यात नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला तरी मागे कसे राहतील. या जोडप्यानेदेखील देवदर्शनाला सुरुवात केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री सोभिता धुलिपाला या दोघांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. दोघांच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ४ डिसेंबरला दोघांनीही एकमेकांना सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले आहे. लग्नानंतर आता या जोडप्याने देवदर्शनाला सुरुवात केली आहे. दोघेही आपल्या सुखी संसारासाठी देव-देवतांचे आशीर्वाद घेत आहेत.
हेही वाचा : “डोळ्यावर पट्टी बांधून एका दुमजली घरात नेलं अन्…”, सुनील पालने सांगितला अपहरणाचा घटनाक्रम; म्हणाला, “२० लाख रुपये…”
नुकतेच सोभिता आणि नागा चैतन्य हे दोघेही देवदर्शनासाठी एकत्र बाहेर पडल्याचे दिसून आले आहे. बऱ्याच दिवसांनी दोघांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र हजेरी लावली आहे. देवदर्शनाच्या वेळी त्यांचे वडील नागार्जुनदेखील त्यांच्याबरोबर हजर आहेत. कुटुंबीयांसह हे जोडपे आता आंध्र प्रदेशमधील श्रीशैलम येथे पोहोचले आहे. श्रीशैलम येते ‘श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला’ देवस्थान आहे. येथे त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी देवाचे दर्शन घेत, दोघांच्या सुखी आयुष्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे.
देवदर्शनाला जाताना नागा चैतन्यने पांढर्या रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान केला आहे. तर, सोभिताने यावेळी पिवळ्या आणि लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे. दोघांचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत असून, चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा : नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?
हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये नागा चैतन्य आणि सोभिताचा विवाह सोहळा शाही पद्धतीने पार पडला. दोघांच्या लग्नाला सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. नागा चैतन्यचे हे दुसरे लग्न आहे. याआधी त्याने अभिनेत्री समांथा रुथ प्रभूबरोबर लग्न केले होते. पुढे या दोघांनी २०२१ मध्ये घटस्फोट घेतला आणि ते विभक्त झाले. त्यानंतर नागा चैतन्य सोभिताला डेट करीत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. ८ ऑगस्ट २०२४ ला नागा चैतन्य व सोभिताचा साखरपुडा झाला आणि पुढे लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या.