दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. समांथाला मायोसायटिस या गंभीर आजाराचं निदान झालं आहे. काही दिवसांपूर्वी तिने रुग्णालयातील फोटो शेअर करत आपल्याला झालेल्या आजाराबाबत माहिती दिली. समांथाच्या आजाराबाबत समजताच चाहते तिच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. आता समांथाचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य आणि त्याचे वडील नागार्जुन तिची भेट घेणार आहेत.

समांथाच्या आजाराबाबत कळताच नागा चैतन्य आणि त्याचे वडील नागार्जुन दोघंही अस्वस्थ झाले असल्याचं बोललं जात आहे. आता हे दोघंही तिला भेटणार आहेत. समांथाला खरंच नागा चैतन्य भेटायला येणार का? याबाबत अजूनही त्याने स्वतः प्रतिक्रिया दिलेली नाही.

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
thipkyanchi rangoli fame Namrata Pradhan sister gunjan Pradhan will get marry
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

याआधी नागार्जुन यांचा मुलगा आणि नागा चैतन्याचा भाऊ अखिल अक्कीने समांथाने आजाराबाबत शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट केली होती. “तुला खूप सारं प्रेम आणि बळ, प्रिय सॅम” असं अखिलने कमेंटच्या माध्यमातून समांथाला म्हटलं. त्याच्या या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

आणखी वाचा – Inside Photos : कधीकाळी अगदी लहान घरामध्ये राहणाऱ्या आदेश बांदेकर यांचं आलिशान घर आहे फारच सुंदर, पाहा फोटो

समांथा व नागा चैतन्य यांचा २०१७मध्ये विवाहसोहळा पार पडला. मात्र यांचा सुखी संसार फार काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या चार वर्षांमध्येच समांथा-नागाने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर संगळ्यांनाचा आश्चर्याचा धक्का बसला होता.

Story img Loader