दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आणि अभिनेता नागा चैतन्यच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. त्या दोघांनी जेव्हा घटस्फोट घेणार असल्याची माहिती दिली तेव्हा त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा सुरु झाली होती. पण समांथा आणि नागा चैतन्यने खरं कारण काय ते अजून सांगितले नाही. दरम्यान, आता नागार्जुनने त्या दोघांनमध्ये नक्की काय झालं होतं याचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियाग्लिट्झने दिलेल्या वृत्तानुसार, नागार्जुनने सांगितले की सगळ्यात आधी समांथाने घटस्फोटाची याचिका केली होती. तर नागा चैतन्यने तिचा निर्णय स्विकारला, पण त्याला माझी चिंता होती, मी काय विचार करने आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेच काय होणार.

आणखी वाचा : रस्त्यावरील मुलांना ५०० च्या नोटा वाटणे नेहा कक्करच्या आले अंगाशी, पाहा काय घडले

नागार्जुन पुढे नागा चैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटाच्या मागे काय कारण आहे ते सांगत म्हणाला, नागा चैतन्यने माझे सांत्वन केले कारण त्याला वाटलं की मला खूप चिंता असेल. दोघेही वैवाहिक जीवनात ४ वर्षे एकत्र होते पण त्या दोघांमध्ये कोणतेही मतभेद नव्हते. दोघे खूप जवळ होते आणि मला माहित नाही की त्यांनी हा निर्णय कसा घेतला. त्यांनी २०२१ चे नवीन वर्ष देखील एकत्र साजरे केले होते, त्यानंतर त्यांच्यात मतभेद झाले असतील.

आणखी वाचा : Video : ‘पुष्पा’तील सामी सामी गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी केला भन्नाट डान्स

काही आठवड्यांआधी, नागा चैतन्यने ज्या प्रकारे समांथासोबत झालेल्या त्याच्या घटस्फोटाचा सामना केला त्याचा मला अभिमान आहे, असे नागार्जुनने सांगितले. नागा चैतन्य आणि समांथा या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय ठरवून घेतला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagarjuna reveals samantha ruth prabhu was the first one to file for divorce with naga chaitanya dcp