Naga Chaitanya & Sobhita Dhulipala Wedding Nagarjuna Shares Photos : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री सोभिता धुलिपाला यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या दोघांच्या लग्नाला तेलुगू इंडस्ट्रीतील दिग्गज मंडळींना आमंत्रित करण्यात आलं होतं. हैदराबाद येथील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये हा विवाहसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला. या समारंभातील सुंदर फोटो नागार्जुन यांनी एक्स पोस्ट करत शेअर केले आहेत. तसेच नव्या सुनेसाठी त्यांनी खास पोस्ट देखील लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागार्जुन यांची खास पोस्ट

नागार्जुन ( Nagarjuna ) लिहितात, “सोभिता आणि माझा चै ( नागा चैतन्य ) या दोघांनी आयुष्याची एक नवीन सुरुवात केली आहे. या दोघांना हा नवीन प्रवास सुरु करताना पाहणं हा माझ्यासाठी खूपच भावनिक क्षण होता. माझ्या लाडक्या चैतन्यचं खूप खूप अभिनंदन! प्रिय सोभिता, तुझं आमच्या कुटुंबात मनापासून स्वागत आहे. तू आमच्या आयुष्यात प्रचंड आनंद आणलास.”

हेही वाचा : नागा चैतन्य दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात! लग्नातील पहिला फोटो आला समोर, सोभिताच्या लूकने वेधलं लक्ष

“हा सुंदर सोहळा अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पार पडला. अक्कीनेनी नागेश्वर राव (ANR) यांच्या शताब्दी वर्षानिमित्त यंदा अन्नपूर्णामध्ये त्यांच्या पुतळ्याचं देखील अनावरण करण्यात आलं होतं. यावेळी संपूर्ण अक्कीनेनी कुटुंबीय उपस्थित होते आणि त्याच त्याचठिकाणी हा उत्सव पार पडला… या सगळ्याचा विचार केला असता यामागचा अर्थ खूपच भरीव आहे. या नव्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचं प्रेम आणि मार्गदर्शन तुमच्याबरोबर आहे. आज माझ्या मुलांना तुम्ही सर्वांनी दिलेल्या आशीर्वादामुळे मी कृतज्ञतापूर्वक तुम्हा सर्वांचे आभार मानतो.” अशी पोस्ट लिहित नागार्जुन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच नव्या सुनेचं त्यांनी अक्कीनेनी कुटुंबात स्वागत देखील केलं आहे.

दरम्यान, नागा चैतन्य आणि सोभिता यांचा साखरपुडा यावर्षी ८ ऑगस्टला पार पडला. नागा चैतन्यच्या राहत्या घरी या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला होता. तेव्हा देखील नागार्जुन यांनी फोटो शेअर करत लेकाला शुभेच्छा दिल्या होत्या. आताही लग्नासोहळा पार पडल्यावर सर्वात आधी नागार्जुन यांनी पोस्ट शेअर करत नव्या सुनेचं अक्कीनेनी कुटुंबात स्वागत केलं आहे.

हेही वाचा : नारकर जोडप्याच्या लग्नाला २९ वर्षे पूर्ण! ‘असा’ साजरा केला वाढदिवस, दोघांच्या रोमँटिक व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

सध्या संपूर्ण कलाविश्वातून नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांच्यावर ( Naga Chaitanya & Sobhita Dhulipala Wedding ) शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.