Akhil Akkineni Engaged to Zainab Ravdjee : प्रसिद्ध तेलुगू अभिनेता नागा चैतन्य अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न करणार आहे. ४ डिसेंबरला चैतन्य व सोभिता लग्नबंधनात अडकतील. त्यांच्या लग्नाआधी चैतन्यच्या सावत्र भावाने आनंदाची बातमी दिली आहे. नागार्जुन अक्किनेनी यांचा धाकटा मुलगा अभिनेता अखिल अक्किनेनीचा साखरपुडा झाला आहे.

अखिलने सोशल मीडियावर फोटो शेअर करून साखरपुडा केल्याची माहिती दिली. अखिलने त्याच्या इन्स्टाग्राम व फेसबुक अकाउंटवर तीन फोटो पोस्ट केले आहेत. “माझा आणि झैनब रावदजीचा साखरपुडा झाला आहे, हे सांगताना मला खूप आनंद होत आहे,” असं कॅप्शन अखिलने या फोटोंना दिलं आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो

हेही वाचा – Video: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने २७ व्या वर्षी उरकला साखरपुडा; सुंदर व्हिडीओ शेअर करून दिली गुड न्यूज

अखिल अक्किनेनीची पोस्ट –

अखिल अक्किनेनीने २०१६ मध्ये श्रिया भुपलशी साखरपुडा केला होता. त्यावेळी अखिल अवघ्या २२ वर्षांचा होता. मात्र लग्न होण्याआधीच त्यांचं नातं तुटलं. अखिल व श्रिया यांचं हैदराबाद विमानतळावर जोरदार भांडण झालंं होतं आणि लग्नाला अवघे काही दिवस बाकी असतानाच ते २०१७ मध्ये वेगळे झाले होते. आता ८ वर्षांनी अखिलने त्याची गर्लफ्रेंड झैनबशी साखरपुडा केला आहे. सावत्र भावाच्या लग्नाआधी त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. अखिलने साखरपुड्याच्या पोस्ट्सच्या कमेंट्स बंद केल्या आहेत.

Akhil Akkineni Engagement with Zainab Ravdjee
अखिल अक्किनेनी व झैनब रावदजी (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – प्राजक्ता माळीचा देवावर विश्वास आहे का? चाहत्याच्या प्रश्नाचं एका शब्दात दिलं उत्तर, म्हणाली…

८ एप्रिल १९९४ रोजी अमेरिकेत जन्मलेला अखिल ३० वर्षांचा आहे. तो अवघ्या वर्षभराचा होता तेव्हा तो १९९५ मध्ये वडील नागार्जुन यांच्या ‘सिसिंदरी’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकला होता. त्याने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. त्याने २०१५ मध्ये आलेल्या ‘अखिल’ चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्याचा हा पदार्पणाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

हेही वाचा – “ड्रेस किंवा लिपस्टिकला दोष देऊ नका”, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या राय बच्चनचा व्हिडीओ; म्हणाली, “स्वतःला कमी…”

त्यानंतर अखिलचे ‘हॅलो’ आणि ‘मिस्टर मजनू’ हे चित्रपट रिलीज झाले पण तेही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाही. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ हा त्याचा चित्रपट हिट झाला होता. त्याच्या ९ वर्षांच्या करिअरमधील हा एकमेव हिट चित्रपट आहे.

Story img Loader