अभिनेत्री आरजू गोवित्रीकरने पती सिद्धार्थ सभरवालवर शिवीगाळ आणि हिंसाचाराचा आरोप करत घटस्फोटसाठी अर्ज दाखल केलाय. आरजूने पती सिद्धार्थ सभरवालवर शिवीगाळ, हिंचा आणि विश्वासहाताचा आरोप केला आहे. आरजू ही अभिनेत्री अदिती गोवित्रीकरची बहीण असून तिने ‘बागबान’ या सिनेमात तसचं ‘नागिन २’ या लोकप्रिय मालिकेत काम केलंय.
आरजूने २०१९ सालामध्ये पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.तसचं तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं देखील एका मुलाखतीत सांगितलं आहे. यावेळी ती म्हणाली, “आता खूप झालं. आता मी शांत बसणार नाही. मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून खूप प्रयत्न केला. मात्र पाणी डोक्याच्यावरून गेल्याने मी त्याच्यासोबत राहू शकत नाही. मी बरेच दिवस शांत राहिले मीडियासमोर काही बोलले नाही. मात्र आता मी बोलणार आहे.” यावेळी आरजूने पती सिद्धार्थवर खळबळजनक आरोप केले आहेत. ती म्हणाली, “त्याने माझ्या गळ्याला पकडून मला घराबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याने मला कानशिलात लगावली, माझ्या पोटात लाथ मारली. असे काही दिवस होते जेव्हा मारहाणीमुळे माझ्या शरीरावर काळे निळे डाग पडले होते. माझ्या जखमा दिसू नयेत म्हणून मी घराबाहेर पडत नव्हते.” असा आरोप आरजूने केला आहे.
हे देखील वाचा: ‘कपिल शर्मा’ शो पाहण्यासाठी विराट कोहलीला मोजावे लागले होते ३ लाख रुपये!
पुढे आरजूने आणखी काही गोष्टींचा खुलासा केलाय. ती म्हाणाली, “आमच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती तेव्हा त्याने माझ्यावर पहिल्यांदा हात उगालरा. त्यानंतर आम्हाला मुलगा झाल्यावर तो वेगळ्या खोलीत झोपू लागला. त्यानंतर, मला कळलं की त्याची एक रशियन गर्लफ्रेंण्ड आहे जिच्याशी तो सतत चॅट करायचाय. आता ते एकत्र आहेत की नाही मला ठाऊक नाही कारण ते वेगळे राहायचे.” यावेळी आरजूने तिच्याकडे काही चॅट आणि हिंसाचाराचं सीसीटीव्ही फुटेज असल्याचं सांगितलं आहे. या पुराव्यांच्या आधारे न्याय मिळण्यास मदत होईल अशी तिला आशा आहे.
दरम्यान सिद्धार्थने घटस्फोटाच्या अर्जात “आरजूला जे काही बोलायचे आहे ते बोलू त्या मला काही बोलायचे नाही” असं म्हंटलं आहे.