दिग्दर्शक नागराज मंजुळेचा ‘सैराट’ हा चित्रपट दिवसेंदिवस प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत चालला आहे. या चित्रपटातील अजय – अतुलने संगतीबद्ध केलेल्या ‘सैराट झालं जी’, ‘याडं लागलं ग याडं लागलं गं’ आणि ‘झिंगाट’ या गाण्यांनी आत्तापासूनच प्रेक्षकांच्या मनावर प्रचंड गारूड केले आहे. त्यापैकी ‘याडं लागलं ग याडं लागलं गं’ या गाण्याचा नवा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. कोवळ्या वयातील प्रेम, नायक आणि नायिकेत उमलणाऱ्या प्रेमाचे हळुवार क्षण याचे सुंदर चित्रण या गाण्यात करण्यात आले आहे. एकुणच हा नवा व्हिडिओ प्रेक्षकांना ‘सैराट’च्या आणखीनच प्रेमात पाडेल, यात शंका नाही. काही दिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सैराट’ चित्रपटातील भूमिकेसाठी रिंकू राजगुरू हिला ज्युरींचा विशेष पुरस्कार मिळाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा