बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती नागराज यांनी हा चित्रपट मराठीत का केला नाही. सोशल मीडियावर सुरु असलेल्या या प्रश्नावर नागराज यांनी उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका मुलाखतीत तुमच्या विरोधाच ‘झुंड’ हा चित्रपट मराठीत का नाही केला? अशी तक्रार सोशल मीडियावर होतं आहे. यावर नागराज म्हणाले, “मग मी म्हणतो पुष्पा मराठीत का नाही केला किंवा तेलगूत का पाहिला, हिंदीत का पाहिलात. मी फेसबूकवर पण पाहतो, सोशल मीडियावर काही सेन्सिबल गोष्टींवर चर्चा होत नाही. पण मला ही गंमत वाटते मराठीत केला पाहिजे. मग बच्चन साहेबांनी पण मराठीत केला पाहिजे ना. बच्चन साहेबांनी मराठी शिकून मराठी भाषेत चित्रपट करता येईल इतरा रुबाब मराठी भाषेचा आणि दिग्दर्शकाचा म्हणजे माझा पाहिजे. त्यासोबत तेवढा वेळ पाहिजे. निर्मात्यांनी तेवढे पैसे दिले पाहिजे की बच्चन साहेब मराठीत चित्रपट करतील.”

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

पुढे नागराज म्हणाले, “हे काही सोप नसतं. आज मी हिंदी चित्रपट केला. उद्या असं होईल की बच्चन साहेब मराठी चित्रपट करतील. पण उगीच असं बसल्या बसल्या फेसबूकवर काही तरी बोलायचं. या सगळ्या गोष्टी लगेच होत नाही, हळू हळू होईल.”

आणखी वाचा : एवढे पैसे कुठून आले? गाडी घेतल्यानंतर धमक्यांचे फोन; व्हिडीओ शेअर करत युट्यूबरने दिले स्पष्टीकरण

आणखी वाचा : युक्रेनच्या ‘या’ महिलेला घाबरत होते रशियाचे राष्ट्रपती पुतिन

दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagraj manjule talks about why jhund is not in marathi dcp
Show comments