बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची क्रेझ अद्याप कायम आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळे यांनी या चित्रपटातील कलाकारांची कास्टिंग कशी झाली, याबाबतचे किस्से सांगितले होते. यावेळी त्यांनी ‘भावना भाभी’ या पात्राबद्दलही सांगितले.

झुंड या चित्रपटात भावना भाभी हे पात्र सायली पाटील हिने साकारले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एबीपी माझा ला दिलेल्या मुलाखतीत या कलाकारांच्या कास्टिंगबद्दलची माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, “सायली ही सैराटच्या ऑडिशनसाठी आली होती. त्यावेळी तिनं चांगल काम केलं होतं. पण तिची निवड झाली नाही.”

prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Bajrang Sonwane On Beed Santosh Deshmukh Case
Bajrang Sonwane : संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना बजरंग सोनवणे भावूक; म्हणाले, “काळजाला…”
Atul Parchure
“जायच्या अगदी दोन महिन्यांआधी मला फोन करून …”, मिलिंद गवळींनी सांगितली अतुल परचुरेंची आठवण; म्हणाले, “फारच वाईट…”
ulta chashma
उलटा चष्मा: भीतीची ‘शॅडो’
What Sadabhau Khot Said?
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांची खंत; “आम्ही तीन पक्षांचं शेत नांगरून दिलं, आमची वेळ आली तेव्हा बैलांसकट…”

“सायली ही फार चांगली कलाकार आहे. ज्यावेळी मी या चित्रपटातील भावना ही भूमिका लिहित होतो, त्यावेळी मला सायली ही भूमिका चांगल्याप्रकारे करेल असे वाटले होते. त्यानंतर मी सायलीला फोन केला. त्यावेळी तिला चित्रपटाबद्दल सांगितले. पण तिला यावर विश्वासच बसत नव्हता.” असे नागराज मंजुळेंनी सांगितले.

यानंतर सायली म्हणाली, “मी सैराट चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. पण तेव्हा माझी निवड झाली नव्हती. त्यानंतर अचानक एक दिवशी मला झुंडसाठी नागराज मंजुळे यांचा फोन आला. त्यावेळी त्यांनी मला फोन केला, यावर मला विश्वासच बसत नव्हता.”

“तेव्हा ते म्हणाले की मी नागराज मंजुळे बोलतो. तेव्हा मी माझ्या मनात म्हणाले, मग मी ऐश्वर्या राय बोलते. मला खरंच वाटतं नव्हतं की नागराज सरांनी मला फोन केला. मला वाटलं माझे मित्र माझ्यासोबत थट्टा मस्करी करत आहेत. त्यानंतर मी नागराज सरांना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी मला चित्रपटाबद्दल सांगितलं. त्यांना पाहून मी थक्क झाले होते. त्यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन हे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत, असेही सांगितले. यानंतर मात्र मला फार भारी वाटलं. आता स्वत:ला पाहून फार छान वाटत आहे.”

दरम्यान ‘झुंड’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ६.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.५० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी २. १० कोटी आणि रविवारी २.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

Story img Loader