देशात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. कोविडची प्रकरणे दररोज झपाट्याने समोर येत आहेत आणि आता बॉलिवूडमध्येही त्याचा कहर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. त्यानंतर आता अभिनेत्याच्या ११ महिन्याच्या बाळाला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता नकुल मेहताला काही दिवसांपूर्वी करोना झाला होता. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याने याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आता नकुलची पत्नी जानकी मेहता आणि ११ महिन्यांचा मुलगा सूफी मेहताला करोनाचा संसर्ग झाला आहे.
आणखी वाचा : ‘पुष्पा’ हिट होऊनही चित्रपटामुळे अल्लू अर्जुनला होतोय ‘हा’ त्रास
जानकीने इन्स्टग्रामवर मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो रुग्णालयातील आहे. सूफीने सुपरमॅनचे कपडे परिधान केल्याचे दिसत आहे. या लूकमध्ये तो खूप क्यूट दिसत आहे. पण या फोटोसोबत जानकीने भावूक पोस्ट शेअर केली आहे.
‘आम्हाला माहिती होते की कधी तरी आपल्याला करोना होणार आहे. पण गेल्या आठवड्यात जे काही झाले त्याचा आम्ही विचारही करु शकत नाही. दोन आठवड्यांपूर्वी माझा पती नकुलला करोना झाला. त्यानंतर मला देखील करोनाची लक्षणे जाणवू लागली. येत्या काळात कठीण परिस्थितीला समोरे जावे लागणार याचा अंदाज होता. दोन दिवसांपूर्वी सूफीला ताप येऊ लागला. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या दिवशी. मध्यरात्री आम्ही सूफीला घेऊन रुग्णालयात पोहोचलो. माझा मुलगा कोविड आयसीयूमध्ये होता. माझ्या फायटर मुलाने करोनावर मात केली. ३ दिवसांनंतर त्याचा ताप गेला’ या आशयाची पोस्ट जानकीने शेअर केली आहे.