अभिनेते नाना पाटेकर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. ९० च्या दशकात एकाहून एक अशा भूमिका ते साकारत होते. त्याचवेळी त्यांचे वैयक्तिक आयुष्य ही चर्चेत होते. एवढंच नाही तर नाना पाटेकर आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

१९९६ मध्ये ‘अग्निसाक्षी’ या चित्रपटात नाना आणि मनीषाने एकत्र काम केले. त्यावेळी मनीषा अभिनेता विवेक मुशरानचा ब्रेकअप झाला होता. तर, नाना यांची पर्सनॅलिटी मनीषाला आवडली होती. त्यांच्यात जवळीक वाढू लागली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी कळताच हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहा बाहेर लोकांनी गर्दी केली.

‘अग्निसाक्षी’ या चित्रपटानंतर नाना आणि मनीषा दोघांनी खामोशी या चित्रपटात पुन्हा एकदा काम केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनीषाच्या शेजार्‍यांनी सांगितले की सकाळी नाना पाटेकर यांना बऱ्याच वेळा तिच्या घरातून बाहेर पडताना पाहिले आहे. यावर नाना एका मुलाखतीत म्हणाले होते की, “मनीषा बहुतेक वेळा माझ्या आई आणि मुलाला भेटायला येत असते आणि माझ्या कुटुंब ही तिला प्रेमाने भेटायचे”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)

नाना आणि मनीषा दोघेही तापट स्वभावाचे होते. बऱ्याचवेळा त्या दोघांचे भांडण झाले. त्यावेळी नाना त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहत होते. मात्र, मनीषासोबत लग्नासाठी ते तयार नव्हते. तर, अभिनेत्री आयशा जुल्का आणि नाना पाटेकर यांच्यात जवळीक वाढु लागल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

आणखी वाचा : या बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेमासाठी केलं धर्म परिवर्तन?

नाना यांच्या या वागणुकीमुळे मनीषाने त्यांच्या सोबत न राहणे पसंत केले आणि तिने मूव्ह ऑन केले. ब्रेकअप होऊनही नाना मनीषाला विसरले नव्हते. ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मनीषा ही उत्तम अभिनेत्री आहे. ती कस्तुरी हरणाप्रमाणे आहे, तिने समजून घेतले पाहिजे की तिला कोणाबरोबर राहणे आवश्यक नाही. तिच्याकडे सगळं आहे आणि गरजेपेक्षा जास्त आहे.”

ते पुढे म्हणाले, “आज ती स्वत: सोबत काय करत आहे हे पाहून माझे अश्रु अनावर होतात. मला आज तिच्याबद्दल काही बोलायचे नसले तरी ब्रेकअप हा सगळ्यात कठीण काळ आहे. मी ज्या दु:खातून गेलो ते मी सांगू शकत नाही. मला मनीषाची आठवण येते.”

Story img Loader