१९९०मध्ये काश्मीरमधून काश्मिरी पंडितांना आपली घरं-दारं सोडून बाहेर पडावं लागल्याच्या घटनेचं चित्रण करणारा ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या चर्चेत आणि काहीसा वादात सापडला आहे. या चित्रपटातल्या विषयावरून देशात समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन गट पडले आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा चित्रपट सगळ्यांनी पाहावा, असं म्हटलं असताना तो टॅक्सफ्री करण्याची मागणी होऊ लागली आहे. दुसरीकडे काही राज्यांनी याला विरोध केला आहे. त्यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांनी या चित्रपटावर आणि वादावर परखड भूमिका मांडली आहे.

नाना पाटेकर यांनी पुण्यातल्या सिम्बायोसिसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना नाना पाटेकर यांनी ‘कश्मीर फाईल्स’वरून सुरू असलेल्या वादावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
article 370 jammu kashmir loksatta news
संविधानभान : अनुच्छेद ३७० मध्ये नेमके काय होते?
sambhal and jaunpur mosque row
Mosque Row in UP: मशिदीच्या जागेवर हिंदूंचे दावे; २०२७ त्या उत्तर प्रदेश विधासनभा निवडणुकांची तयारी?
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Syria loksatta news
अग्रलेख : वाळवंटातले वालीहीन!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

“चित्रपट मी पाहिलेला नाही, पण…”

“हा चित्रपट मी पाहिलेला नाही. त्यामुळे मला त्याबद्दल सविस्तर बोलता येणार नाही. तो पाहिला असता तर मला सांगता आलं असतं. पण एखाद्या चित्रपटाबद्दल असा वाद होणं बरोबर नाही”, असं नाना पाटेकर म्हणाले आहेत.

“मला वाटतं की इथले हिंदू आणि इथले मुसलमान हे इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहाणं गरजेचं आहे. त्यांनी एकत्रच राहावं. गट होत असतील तर ते चुकीचं आहे”, असं देखील नाना पाटेकर यांनी नमूद केलं.

‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त करण्यास राज्य सरकारचा नकार, अजित पवार म्हणाले “केंद्र सरकारनेच…”

“चित्रपटातली वस्तुस्थिती काहींना पटेल, काहींना…”

“मला वाटतं की ही तेढ कुठला समाज निर्माण करतो अशातला भाग नाही. ही तेढ कुणी जाणूनबुजून निर्माण करत असेल, तर त्या माणसाला तुम्ही प्रश्न विचारा. सगळे छान सलोख्यानं राहात असताना मध्येच कुठेतरी बिब्बा घालायचा याची काही गरज नाहीये. चित्रपट आहे तो तसाच पाहावा. त्यातली वस्तुस्थिती काहींना पटेल, काहींना पटणार नाही. त्यामुळे त्यावरून गट पडणं साहजिक आहे. पण म्हणून त्यावरून समाजात तेढ निर्माण होणं हे योग्य नाही”, अशा शब्दांत नाना पाटेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“आपल्याला एकमेकांचा आधार वाटणं गरजेचं आहे. आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही, असं जोपर्यंत दोन्ही समाजांना, तुम्हा-आम्हा भारतीयांना वाटत नाही, तोपर्यंत हे असे पोळी भाजणारे खूप असतील. परदेशी व्यक्तीचा विषय आला की सगळे लगेच भारतीय होतात. मग अशावेळी जात-धर्म का आठवतात? त्यामुळे सर्वांनी आपण भारतीय आहोत एवढंच मानून चालायचं”, असं देखील नाना पाटेकर यावेळी म्हणाले.

Story img Loader