महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट- असा नट होणे नाही’ चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्या कसदार अभिनयाने संपन्न ‘नटसम्राट’ चित्रपटाने तिकीट बारीवर अवघ्या आठवडाभरात २२ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या कमाईसह ‘नटसम्राट’ हा चित्रपट मराठीतील सर्वाधिक ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे. नववर्षाच्या मुहूर्तावर ‘नटसम्राट’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपट तिकीट बारीवर चांगली कमाई करत असल्याने मराठी चित्रपटसृष्टीची यंदाच्या वर्षाची सुरूवात दमदार झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दहा दिवसात २२ कोटींचा गल्ला जमवून ‘नटसम्राट’ने अभिनेता रितेश देशमुखच्या ‘लय भारी’वर मात केली. ‘नटसम्राट’ चित्रपट राज्यभरात ४०० चित्रपटगृहे आणि दिवसाला १६०० शोजमधून दाखवला जातो आहे. नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

Story img Loader