प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांचा आगामी चित्रपट ‘द कन्फेशन’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या टीझरनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता असल्याचं दिसत आहे. ‘द कन्फेशन’चा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मागच्या काही काळापासून नाना पाटेकर कोणत्याही चित्रपटात दिसलेले नाहीत. पण लवकरच ते दमदार अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द कन्फेशन’ चित्रपटाच्या टीझरमध्ये त्यांचा भरदस्त आवाज ऐकू येत आहे. केवळ २२ सेकंदांच्या या टीझरनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Viral video of a man fell into boiled water shocking video on social media
VIDEO: उकळत्या पाण्याच्या टोपात पडला अन्…, माणसाबरोबर पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा चुकेल ठोका
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो

आणखी वाचा- आलिया भट्टच्या काकांनी सांगितली लग्नाची तारीख, या दिवशी घेणार रणबीरसोबत सप्तपदी

या टीझरच्या सुरुवातीला नाना पाटेकर “सच का चेहरा देख लिया मैंने, सच की आवाज भी सुनली, सच जानकर भी कुबूल नही मुझे, अगर जान भी जाए वो कुबूल है मुझे” असं बोलताना ऐकू येत आणि सर्वात शेवटी ते न्यायालयातील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेले दिसून येत आहेत. दरम्यान हा चित्रपट नेमका कोणत्या विषयावर आधारित आहे याचा उलगडा टीझरमधून झालेला नाही त्यामुळे या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा असलेली पाहायला मिळत आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलवरून नाना पाटेकर यांच्या या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘नाना पाटेकर लवकरच द कन्फेशन या चित्रपटात दिसणार आहेत. मोठ्या ब्रेकनंतर ते मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. त्यांच्या ‘द कनफेशन’ चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन करणार आहेत’ तरण आदर्श यांचं हे ट्वीट सध्या बरंच चर्चेत आहे.

Story img Loader