अभिनेते नाना पाटेकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. कलाक्षेत्रामधील या दिग्गज अभिनेत्याचं राहणीमान अगदी साधं आहे. नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकरने देखील वडिलांचेच सगळे गुण अवगत केले आहेत. वडील सुप्रसिद्ध कलाकार असून देखील नाना पाटेकर यांचा मुलगा अगदी सामान्य कुटुंबातील मुलासारखा राहतो. मल्हारच्या स्वभावाचं तसेच त्याच्या साधेपणाचं कौतुक देखील होताना दिसतं.
आणखी वाचा – शरीरयष्टीवरुन ट्रोल करणाऱ्यावर भडकला अर्जुन कपूर, गर्लफ्रेंड मलायकालाही राग अनावर, म्हणाली…
मल्हार वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. तो कलाक्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सध्या मेहनत घेत आहे. अभिनय तसेच दिग्दर्शन क्षेत्रातही मल्हार काम करतो. २०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द लिटिल गॉडफादर’ चित्रपटात त्याने छोटीशी भूमिका देखील साकारली. त्याचा हा पहिलाच चित्रपट होता. आता तो निर्माता म्हणून काम करु लागला आहे.
राम गोपाळ वर्मा यांच्या ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी मल्हारने सांभाळली. तसेच नाना पाटेकर यांच्या ‘अब तक छप्पन’ या चित्रपटाच्या सीक्वेलसाठीही त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. सध्या तो नाना पाटेकर यांच्या नाना साहेब प्रॉडक्शन हाऊस कंपनीसाठी काम करत आहे. निर्माता म्हणून तो सध्या या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम पाहतो.
आणखी वाचा – कमल हासन यांच्या ‘विक्रम’पुढे अक्षय कुमारने टेकले हात, ४ दिवसांमध्येच ‘सम्राट पृथ्वीराज’कडे प्रेक्षकांची पाठ
त्याचबरोबरीने अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रामध्येही मल्हार कार्यरत आहे. मल्हार आणि त्याचे वडील नाना पाटेकर यांच्यामध्ये खूप घट्ट नातं आहे. तसेच मल्हारचं त्याची आई नीलकांती यांच्यावर देखील खूप प्रेम आहे. तसेच नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनबरोबरही मल्हार काम करतो.