बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या घरी २१ फेब्रुवारी रोजी नव्या पाहुण्याचे आगमन झाले. करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर करीना आणि सैफचे चाहते त्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी आतूर होते. मात्र, सैफ आणि करीनाने त्यांच्या दुसऱ्या मुलाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी फक्त बाळाचा फोटो नाही तर त्याच नावही कोणाला सांगितलं नाही. आता करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी करीना आणि सैफने बाळाचे नाव ‘जेह’ ठेवल्याचे सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणधीर यांनी नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना करीनाच्या दुसऱ्या बाळाच्या नावासंबंधी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, ‘करीनाच्या मुलाचे नाव एक आठवड्यापूर्वीच ठरवण्यात आले आहे. सैफ आणि करीनाने मुलाचे नाव ‘जेह’ असे ठेवले आहे.’

आणखी वाचा : बबीताच्या पोस्टवर कमेंट केल्यामुळे टप्पू झाला ट्रोल, नेटकरी म्हणाले…

काय आहे जेह नावाचा अर्थ?

‘जेह’ हा लॅटिन शब्द आहे. या शब्दाचा अर्थ ‘ब्लू क्रेस्टेड बर्ड’ आहे. याचा अर्थ निळ्या तुर्याचा पक्षी आहे. तर पारसी मध्ये (to Come, to bring) म्हणजे ‘येणे आणि आणणे आहे’. या अर्थाने बघितलं तर करोना काळात आणि लॉकडाउनच्या काळात ‘जेह’ खान आणि कपूर कुटुंबासाठी आनंद घेऊन आला आहे.

आणखी वाचा : राजस्थानहून भेटवस्तू घेऊन आला चाहता, पण जान्हवीची वागणूक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

२० डिसेंबर २०१६ साली सैफ आणि करीनाला तैमूर हा पहिला मुलगा झाला. तैमूरला लाडाने ते ‘टीम’ असे म्हणतात. तर आता सैफ त्याच्या दुसऱ्या मुलाला ‘जेह’ म्हणत असल्याचे समोर आले आहे. तसेच रणधीर कपूर यांनी करीनाच्या मुलाचे नाव ‘जेह’ असल्याचे स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana randhir kapoor conforms kareena kapoor khan and saif ali khan name their son jeh know the meaning of jeh dcp