देशात सध्या करोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. जनसामान्यांसोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही या लसीकरणाचा लाभ घेताना दिसत आहेत. नुकतंच बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या परिवारानेही लसीकरणाचा लाभ घेतला. तर आज अजून काही सेलिब्रिटींनी लस टोचून घेतली आहे.

दिग्दर्शक नंदिता दास, अभिनेता राम कपूर आणि त्याची पत्नी अभिनेत्री गौतमी कपूर, अभिनेता रघू राम या कलाकारांनी नुकतंच करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. याबद्दल या कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून माहिती दिली आहे. नंदिता दास यांनी लस घेतानाचा आपला फोटो ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी इतरांनाही लस घेण्याचं आवाहन केलं आहे.


अभिनेता राम कपूर यांनीही लस घेतानाचा आपला व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत ते लस घेताना खोटं खोटं रडत लसीकरणाची प्रक्रिया एन्जॉय करताना दिसत आहे. हे सगळे लोक खूप मेहनत करत आहेत. त्यांना थोडं हसवू शकलो याचा आनंद आहे. सर्व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे आभार!, असं कॅप्शनही त्यांनी या व्हिडिओला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor)

रिऍलिटी शोमधून नावारुपाला आलेला रघु राम यानेही करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. त्यानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लस घेतानाचा फोटो शेअर केला आहे.

Story img Loader