जागतिक स्तरावर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘गोल्डन ग्लोब पुरस्कारा’चा आंतरराष्ट्रीय मतदार म्हणून मुंबईतले पत्रकार नरेंद्र बंडबे यांची निवड झाली आहे. यंदा या पुरस्काराचे ८१ वे वर्ष आहे. त्यासाठी बंडबे यांची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय मतदार म्हणून भारतातून निवडल्या गेलेल्या काही मोजक्या पत्रकारांपैकी ते एक ठरले आहेत. नरेंद्र बंडबे जागतिक सिनेमांचे मराठी भाषेतून समीक्षण करत असतात. गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय मतदार म्हणून निवड झालेले ते एकमेव मराठी चित्रपट समीक्षक ठरले आहेत. सध्या जगभरात गोल्डन ग्लोब पुरस्कराचे २०० हून अधिक मतदार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनील शेट्टीने जावई केएल राहुलच्या खराब कामगिरीबद्दल केलं भाष्य; म्हणाला, “मी त्याला क्रिकेट…”

‘द हॉलीवूड फॉरेन प्रेस असोसिएशन’ (HFPA) तर्फे ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ १९४४ सालापासून देण्यात येतो. ज्यासाठी जगातल्या ६२ देशांमधले मतदार मतदान करतात. सिनेमा आणि टेलिव्हिजन क्षेत्रासाठीचे पुरस्कार या नावाखाली देण्यात येतात. गेल्या वर्षी जगभरातून १०३ पत्रकारांची मतदार म्हणून निवड करण्यात आली होती. त्यात मिनाक्षी शेड्डे या एकमेव भारतीय पत्रकार होत्या. यंदा त्यात नरेंद्र बंडबे यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. त्यामुळे आता पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय मतदारांची संख्या २०० हून अधिक झाली आहे.

अभिनेत्री अमिषा पटेलच्या अडचणीत वाढ, न्यायालयाकडून वॉरंट जारी; नेमकं प्रकरण काय?

नरेंद्र बंडबे गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक स्तरावरच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावत आहेत. प्रतिष्ठेच्या बर्लिन (जर्मनी), कार्लोवी वॅरी (झेक प्रजासत्ताक) आदी फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांनी आपली हजेरी लावली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल केरळ, २०२२ इथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी फिप्रेस्की ज्यूरी म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे.

गोल्डन ग्लोब पुरस्कार नामांकनाची प्रक्रिया कशी असते?

अमेरिकेतले फिल्म प्रॉडक्शन कंपन्या आणि स्टुडिओ त्यांचे सिनेमे आणि टेलिव्हिजन सीरीयल्सच्या एंट्री पाठवतात. यावर गोल्डन ग्लोबचे आंतरराष्ट्रीय मतदार सिनेमा किंवा टेलिव्हिजन सीरीयल संदर्भात संबंधित कॅटेगरीबद्दल आपलं मत नोंदवतात. यात १ ते ५ असं मानांकन द्यायचं असतं. त्यानंतर ही मतं विचारात घेऊन नामांकनाची अंतिम यादी तयार केली जाते.

मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराला गोल्डन ग्लोबचे नियम पाळावे लागतात. त्यासाठी कोड ऑफ कंडट आखून दिलेला असतो. या मतदारांच्या यादीत स्वतंत्र पत्रकार आणि सिनेमाक्षेत्राशी संबंधित व्यक्ती असतात.

जगभरातल्या २०० हून अधिक मतदारांमध्ये ५२ टक्के महिला मतदार आहेत तर पुरूष मतदारांची टक्केवारी ५१.५ टक्के इतकी आहे. भौगोलिकदृष्या जगभरातल्या ६२ देशांमधले मतदार गोल्डन ग्लोबसाठी मतदान करतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra bandabe selected as international voter for golden globe awards hrc
Show comments