अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांना कॅन्सरचं निदान झालं आहे. राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाला आहे. ह्रतिक रोशनने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत वडिलांच्या आजारपणाबद्दलची माहिती दिली. यानंतर अनेकांनी राकेश रोशन यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नरेंद्र मोदींनी ह्रतिकच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत लिहिलं की, ‘डिअर ह्रतिक, राकेश रोशन यांच्या चांगल्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो. ते एक लढवय्या आहेत. मला खात्री आहे की ते धैर्याने या आव्हानाला सामोरं जातील’.

राकेश रोशन यांचा फोटो शेअर करताना ह्रतिकने एक भावनिक पोस्ट लिहिली होती. ‘आज सकाळी मी वडिलांना सोबत एक फोटो काढण्यासाठी विचारलं. सर्जरीच्या दिवशीही ते जीमला येणं विसरणार नाहीत याची खात्री होती. माझ्या परिचयात असणाऱ्यांपैकी ते सर्वात कणखर व्यक्ती आहते. काही आठवड्यांपूर्वी त्यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. पण या लढ्याला ते अत्यंत उमेदीने सामोरं जात आहेत. आम्हाला त्यांच्यासारखा कुटुंबप्रमुख लाभला हे आमचं भाग्य आहे’, असं ह्रतिकने पोस्टमध्ये लिहिलं होतं.

राकेश रोशन यांनी ‘घर घर की कहानी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. खूबसूरत, खेल खेल मै चित्रपटातील त्यांचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. दिग्दर्शनातही राकेश रोशन यांना चांगलंच यश मिळालं. कोई मिल गया, कहो ना प्यार है, करण अर्जून आणि खून भरी मांग हे त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. राकेश रोशन यांची मुलगी सुनैना रोशन हिलादेखील कॅन्सर झाला होता. मात्र तिने त्याच्यावर मात केली होती.