बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी हा सीरियल किसर म्हणून ओळखला जातो. त्याने अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रींसोबत रोमँटिक सीन्स दिले आहेत. पण एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री सीनमध्ये इतकी मग्न झाली होती की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही तिने इम्रानला किस करणे थांबवले नव्हते. स्वत: अभिनेत्रीने स्वत: हा खुलासा केला होता.
२०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘अजहर’ चित्रपटाच्या वेळी हा किस्सा घडला होता. या चित्रपटात इम्रान हाश्मीसोबत अभिनेत्री नरगिस फाखरी मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातील ‘बोल दो ना जरा’ हे गाणे हिट ठरले होते. आता या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेत आहे.
आणखी वाचा : नमाज पठण करणाऱ्या व्यक्तीने तक्रार करताच आर माधवन म्हणू लागला गायत्री मंत्र; ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
मेकिंग व्हिडीओमध्ये इम्रान आणि नरगिस एक किसिंग सीन शूट करत असतात. जवळपास पाच वेळा हा सीन शूट करण्यात आला होता. एकदा दिग्दर्शकाने कट असे म्हटले तरी नरगिस इम्रानला किस करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. ते पाहून सर्वांना धक्का बसतो. पण सर्वजण ते मजेशीर अंदाजात घेतात.
या व्हिडीओमध्ये नरगिस बोलताना दिसत आहे की, ‘मला एक सीनदरम्यान इम्रानला पाच वेळा किस करावे लागले होते. त्यासाठी मी जास्त पैसे घेणार होते. कारण हे माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नव्हते. किसिंग सीन देताना इम्रानने असा अभिनय केला की अरे देवा मला हे खरच माहिती नाहीये. पण असे अजिबात नव्हते. तो या सगळ्यात आनंदी होता.’
‘अजहर’ या चित्रपट माझी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या जीवनावर आधारीत होता. या चित्रपटात इम्रानने मोहम्मद अजहरुद्दीन यांची भूमिका साकारली होती. तर नरगिसने संगीता बिजलानी यांची भूमिका साकारली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन टोनी डिसूजा आणि अँथनी डिसूजा यांनी केले होते. या चित्रपटात प्राची देसाई देखील दिसली होती.