होळी हा अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाने परिपूर्ण असा सण. रंग आणि रूचकर खाद्यपदार्थांची रेलचेल असणाऱ्या या सणाची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाची होळी आपण कशाप्रकारे साजरी करणार हे सांगतेय बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाक्री.
तुझ्या बालपणीची होळीबद्दलची खास आठवण आहे काय?
२०११ मध्ये भारतात येईपर्यंत मी होळी साजरी केलेली नव्हती. पण नंतर ती संधी मिळाल्यानंतर मी खूप धमाल केली.
तुझं आवडतं होळीचं गाणं कोणतं?
तसं खास आवडतं गाणं सांगता येणार नाही पण मी जेव्हा प्रथमच एका होळी पार्टीला गेले होते तिथे ‘रंग बरसे’ हे गाणं एकसारखं वाजवलं जात होतं.
होळीदरम्यान तू सौंदर्य आणि आरोग्याची काळजी कशी घेतेस?
होळी खेळायला सुरुवात करण्यापूर्वी केसांना चांगल्या पद्धतीने कंडिशन करा. तुमचे केस अपायकारक रासायनिक पदार्थ आणि रंगांच्या सान्निध्यात येण्यापूर्वी त्यांना संरक्षण कवच पुरवणं आवश्यक आहे. गरम खोबरेल तेलाने केसांना २० मिनिटं डीप कंडीशनिंग करण्याला मी प्राधान्य देते. त्यामुळे केस कोरडे आणि शुष्क बनत नाहीत. या प्रक्रियेमुळे केसांना पुरेसं पोषण मिळतं आणि रंगांमधल्या हानिकारक रासायनिक घटकांपासून केसांचं संरक्षणही होतं. शिवाय उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मी सतत ताजा फळांचा रस आणि नारळाचं पाणी पित राहते.
होळीसाठी एखादी हेअरस्टाइल सुचव ना…
मला गमतीशीर आणि थोडी वेगळी हेअरस्टाइल करायला आवडते. तुम्हाला केसांच्या मोकळ्या बटा आवडत असतील तर उर्वरित केस फ्रेंच पद्धतीच्या वेणीत किंवा पोनीटेलमध्ये बांधून या बटा स्वतंत्र ठेवा. खडे लावलेले क्लिप्स किंवा बॅण्डसही केसांना लावून छानशी हेअरस्टाइल करता येते.
होळी खेळताना तुला कोणते कपडे घालायला आवडतात?
होळीचा आनंद घेताना मला सर्वाधिक आरामदायी कपडे घालायला आवडतात. शॉर्टस घालून त्यावर मी सैलसर टीशर्ट किंवा कुडता घालते. उन्हाची फार झळ बसू नये यासाठी मी हलकेफुलके सुती कपडे घालणंच पसंत करते.
यंदाची होळी तू कशी साजरी करणार आहेस?
दुर्दैवाने मला यंदाची होळी साजरी करता येणार नाही कारण त्यादिवशी मी काम करतेय.
होळीच्या दिवशी तुला काय खायला आवडतं?
मला खायला खूप आवडतं. त्यामुळे मी होळीच्या निमित्ताने वेगवेगळे पदार्थ चाखून पाहते. एकदा मी गुजिया खाल्ले होते. बरेचदा बिर्याणी आणि गोड पदार्थ असाच बेत असतो.
भारतात येईपर्यंत होळी साजरी केली नव्हती – नर्गिस फाक्री
होळी हा अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाने परिपूर्ण असा सण. रंग आणि रूचकर खाद्यपदार्थांची रेलचेल असणाऱ्या या सणाची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात.
First published on: 12-03-2014 at 04:28 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinemaहोळी सेलिब्रेशनHoli Celebration
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nargis fakhri holi celebration